Type Here to Get Search Results !

महापुरुषांच्या चौकातील खड्डे तत्काळ दुरुस्त करा अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल

 सार्वजनिक शिवजयंती सोहळा समिती उदगीर च्या वतीने निवेदन सादर




छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर ते छत्रपती राजर्षी शाहु महाराज चौक उदगीर पुढे बीदर रोड उड्डाण पूल रस्त्यावर गेली अनेक महिने झाली रस्त्यावर खोलवर खड्डे पडली आहेत

असंख्य पडलेल्या खड्यानी अक्षरशः रस्त्याची चाळण झालेली अजून हा रस्ता उदगीर शहरातील मुख्य रस्ता आहे, दररोज शहरातील तथा इतर राज्यातील हजारो वाहनाची ये जा या रस्त्यावरून होते, खड्डे चुकवाण्याच्या प्रयत्नात अनेक वाहनाचे अपघात हे सर्रास झाले आहेत त्यातून असंख्य वाद भांडणे कायदेशीर प्रकरणे वाढली आहेत, रोजची वाहतूक ही वाहतूक समस्यांमुळे सर्वसाधारण नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, महिला वयस्क यांना यामुळे असंख्य रोषाला सामोरे जावे लागत आहे.

अनेक जागरूक वर्तमान पत्रातून अनेक वेळा या रस्त्यावरील खड्यामुळे झालेल्या व होणाऱ्या अपघातांची माहिती आपल्या बातमी या माध्यमातून सादर झाली पण निगरगट्ट शासकीय अधिकाऱ्याचा अनास्थेमुळे कोणतीही दखल घेण्यात आली नाही, हा रस्ता नगरपालिका हद्द, सार्वजनिक बांधकाम विभाग तथा राष्ट्रीय महामार्ग अश्या वेगवेगळ्या हद्दीत येतो या त्यामुळे सदरील जबाबदार अधिकारी कोणीही जबाबदारी स्वीकारत नाही एकमेकांच्या विभागावर हा विषय टोलवाटोलवी करण्यात येत आहे. या ठिकाणची ही समस्या ही सततची झाली आहे, प्रत्येक वेळी सामाजिक संघटने निवेदने देते, आंदोलने करते,पत्रकार वेळोवेळी बातम्या लिहितात,   

त्यामुळे प्रशासन व ठरलेल्या शासकीय गुत्तेदाराने मजबुतीकरणाडे लक्ष न देता निव्वळ थातूर मातुर डांबरीकरण

करायची पुन्हा ते येरे माझ्या मागल्या अशी गत होते व पुन्हा या चौकातील खड्डे आकार घेतात ही सततची गंभीर समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे सदरील रस्ता चौक मजबुतीकरणासह तत्काळ दुरुस्त करण्यात यावे अन्यथा सदरील ठिकाणी प्रत्येक खाद्यात बेशरमांची लागवत करत रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल

    या बाबीचे निवेदन आज  

उपजिल्हाधिकारी उदगीर

अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागा उदगीर, तथा मुख्याधिकारी नगरपालिका उदगीर यांना देण्यात आले.

 या वेळी निवेदनावर सार्वजनिक शिवजंती महोत्सव समिती उदगीर चे 


मदन पाटील, प्रदीप पाटील, राहुल पाटील, गंभीरे अण्णाराव, सतीश पाटील मानकीकर, ताटपले अंकुश, बाबासाहेब पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, राहुल अतनुरे, प्रतीक शिंदे, पंकज कालानी, बालाजी नादरगे, नागेश पटवारी, गणेश जाधव, वाडकर गुणवंत, रेवते मधुकर, बस्वराज डांगे, भरत कोयले, विशाल देवणे, उत्तम बिरादार, अमोल पाटील, रवी सावरगावकर, नागनाथ गुट्टे, ओमकार पिंगळे

Post a Comment

0 Comments