Type Here to Get Search Results !

आधार हॉस्पिटलमध्ये निष्काळजीपणामुळे अपघात; काचाचा दरवाजा फुटला – सुदैवाने कोणतीही दुखापत नाही

 आधार हॉस्पिटलमध्ये निष्काळजीपणामुळे अपघात; काचाचा दरवाजा फुटला – सुदैवाने कोणतीही दुखापत नाही



नांदेड – आधार हॉस्पिटलमध्ये वापरात असलेल्या निर्जंतुकीकरण मशीनमध्ये गंभीर तांत्रिक दोष आढळल्याने अचानक उच्च दाबाची हवा बाहेर पडली आणि त्यामुळे काचाचा दरवाजा जोरात फुटला. ही घटना हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे प्राथमिक निरीक्षणातून स्पष्ट होत आहे.


रुग्णालयातील निर्जंतुकीकरण यंत्रांची नियमित तपासणी आणि देखभाल झाली असती, तर अशा प्रकारची घटना टाळता आली असती,  संबंधित मशीनचे वेळोवेळी निरीक्षण न केल्यामुळेच ही धोकादायक परिस्थिती निर्माण झाली.


या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हॉस्पिटल व्यवस्थापन किती उदासीन आहे, हे अधोरेखित होते.


डॉ. संजय कदम यांनी घटनेची माहिती दिली असून, त्यांनी सांगितले की रुग्णालयाच्या कामकाजावर याचा काही परिणाम झाला नसला तरी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले


#nanded #news #HospitalInNanded #aadhar

Post a Comment

0 Comments