उदगीर...
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात नागपंचमीच्या निमित्ताने विद्यार्थिनींसाठी पारंपरिक भुलई खेळविण्यात आली. या उपक्रमात विद्यार्थिनी व महिला प्राध्यापकांनी पारंपरिक गाणी सादर करत फेर धरून उत्साहात सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ सदस्य प्रा. मनोहर पटवारी व प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा देत नागपंचमी व भारतीय सणांचे शैक्षणिक व सांस्कृतिक महत्त्व विशद केले. यावेळी प्रा. एस. बी. येडले, प्रा. पी. बी. बळवंत, प्रा. डॉ. ए. पी. मोरे, प्रा. डॉ. एस. जी. अन्सारी, प्रा. डॉ. एस. व्ही. भद्रशेट्टे तसेच महिला प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन शैक्षणिक धोरणात स्थानिक सण व परंपरांना महत्त्व देण्यात आले असून अशा उपक्रमांतून विद्यार्थिनींना आत्मविश्वासाने अभिव्यक्त होण्याची आणि प्रतिभा सादर करण्याची संधी मिळते, तसेच भारतीय प्राचीन संस्कृतीचे जतनही होते.

Post a Comment
0 Comments