लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत नागपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा.
उदगीर....येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना प्राणीमात्रांना द्या करणे,हा संस्कार रुजवण्यासाठी नागपंचमी हा सण माता पालक संघातर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे,प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी,माता पालक संघ प्रमुख सौ.दैवशाला क्षीरसागर व विभाग प्रमुख सुधाकर पोलावार उपस्थित होते. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी बनवलेल्या नागांची पूजा करण्यात आली.सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी यांनी नागपंचमीचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. सापाबद्दल असलेले गैरसमज दूर केले सापांच्या विविध जाती बद्दल माहिती सांगितली.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी भारत देश हा कृषिप्रधान देश आहे.आपल्या देशात शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणे केला जातो.शेतकरी धान्य पिकवतो.उंदीर धान्याची नासाडी करतात .उंदराला साप खातात. त्यामुळे निसर्गाचा समतोल टिकून राहतो ,म्हणून सापाला शेतकऱ्याचा मित्र असे म्हणतात. सर्वांनी प्राणीमात्रावर दया केली पाहिजे. असे मार्गदर्शन केले.
सुत्रसंचलन सौ.सोनिया देशपांडे यांनी केले. यानंतर शाळेतील सर्व मुलींनी व महिला शिक्षकांनी भूलई व फुगडीचा आनंद लुटला.

Post a Comment
0 Comments