Type Here to Get Search Results !

राज्यस्तरीय विज्ञान प्रयोग स्पर्धेत पोस्ते पोदार स्कूलचे यश

 राज्यस्तरीय विज्ञान प्रयोग स्पर्धेत पोस्ते पोदार स्कूलचे यश



उदगीर प्रतिनिधी,

रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात पोस्ते पोद्दारचे घवघवीत यश मिळवले आहे.


उदगीर मधील पोस्ते पोद्दार लर्न स्कूलने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट प्रदर्शन करून प्रथम क्रमांक पटकावला. यामुळे त्या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने त्यांचे भव्य सत्कार करण्यात आले.

 राज्यस्तरीय स्पर्धेत श्रीया गोविंद देबडवार,शर्मिष्ठा कर्णसाई पवनकर,निधी बालाजी कोंडरे, लावण्या स्वप्नील घाटगे यावरील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट प्रस्ताविक व विज्ञान प्रदर्शनातील मॉडेलचे मांडणी केली होती. या यशाबद्दल पोस्ते स्कूलचे सचिव सुरज पोस्ते, मुख्याध्यापक दिगंबर शेखापुरे. यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


या वेळी समन्वयक मंजुषा पाटील, सोवेना खैरा, मीनाक्षी बिरादार, सांस्कृतिक विभाग प्रमुख. कृष्णा ततापुरे, कला शिक्षक जहांगीर पटेल, अनिल वाघोवसे व शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी व पालक बहुसंख्यांनी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments