Type Here to Get Search Results !

शेतकरी बांधवांना कुठलीही अडचण येऊ देणार नाही : माजी मंत्री आमदार संजय बनसोडे

 शेतकरी बांधवांना कुठलीही अडचण येऊ देणार नाही : माजी मंत्री आमदार संजय बनसोडे



*मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते या क्रांतिकारी योजनेचा आ.संजय बनसोडे यांनी घेतला आढावा*


उदगीर : जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यासाठी मी कटीबद्ध असून भविष्यात

शेतकरी बांधवांना कुठलीही अडचण येऊ देणार नाही असे मत माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

ते उदगीर येथे नविन शासकीय विश्रामगृह येथे आयोजीत मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते या क्रांतिकारी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा बैठकीप्रसंगी बोलत होते.


यावेळी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे, तहसीलदार राम बोरगावकर, राजेश लांडगे, उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी, जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र तिरुके, जि. प. सदस्य प्रा. दिलीपकुमार मटके, जि.प. सदस्य डॉ. दीपक सोमवंशी, जि. प. सदस्य ज्ञानेश्वर बिरादार, यमुनाजी भुजबळे आदी उपस्थित होते.


यावेळी आ.संजय बनसोडे यांनी शेतकऱ्यांना येत असलेल्या विविध अडचणी संदर्भात सविस्तर आढावा घेतला. त्यानंतर

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते या क्रांतिकारी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेवुन या बैठकीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी,अतिक्रमण काढण्यासाठी लागणारे संरक्षण,प्रलंबित कामे, निधीची स्थिती व प्रत्यक्ष अंमलबजावणी याबाबत माहिती घेवुन अधिका-यांना शेतक-यांची प्रलंबित असलेली सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सुचना आ.संजय बनसोडे यांनी दिल्या.

*****************

Post a Comment

0 Comments