रमजान ईदचा सण हा आनंद, शांतता आणि एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करण्याचा उत्सव : माजी मंत्री आ.संजय बनसोडे
पवित्र रमजान ईद निमित्त माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्याकडुन शुभेच्छा
उदगीर : पवित्र रमजान महिन्याची सांगता होत असताना साजऱ्या होणाऱ्या रमजान ईदच्या निमित्ताने आमदार संजय बनसोडे यांनी ईदगाह मैदानावर उपस्थित राहून सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. रमजान महिना हा संयम, त्याग, दया आणि मानवतेचा संदेश देणारा आहे. या पवित्र महिन्यात उपवास, प्रार्थना आणि दानधर्माच्या माध्यमातून समाजात बंधुभाव व एकोपा वृद्धिंगत होतो. ईदचा सण हा आनंद, शांतता आणि एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करण्याचा उत्सव असून, तो समाजात एकात्मतेची भावना अधिक दृढ करतो असे माजी आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देवून गळाभेट घेवुन पवित्र रमजान ईदच्या आ.संजय बनसोडे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मौलाना मुस्ताक खतीब, माजी आ.गोविंदराव केंद्रे, नगरसेवक सचिन हुडे, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, गटनेते अनिल मुदाळे, जि.प. सदस्य डाॅ.दिपक सोमवंशी, जि.प. सदस्य ज्ञानेश्वर बिरादार, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, सनाउल्ला खान, नरसिंग शिंदे, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, नगरसेवक राजकुमार भालेराव, सर्जेराव भांगे, प्रा.श्याम डावळे, वसंत पाटील, शशिकांत बनसोडे, शिवकुमार कांबळे, अमर सुर्यवंशी, धिरज कसबे, सय्यद इम्रान, इमरोज हाशमी,फय्याज शेख, इब्राहिम नाना पटेल, राजकुमार चव्हाण, प्रा.शिवाजीराव देवनाळे, शफी हाशमी, संदीप देशमुख, बापू साळुंके, हिफ्जुरहेमान हाशमी, अखिल मोमीन, युसुफ बागवान, बाबासाहेब सुर्यवंशी, सोनु हाशमी, सुलतान मिर्झा, शहेबान शेख, सय्यद वसिम, सय्यद अफरोज पटवेघर, सय्यद इम्रान, अविनाश गायकवाड आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी सर्व समाजबांधवांना आवाहन केले की, धर्म, जात, पंथ यापलीकडे जाऊन आपण सर्वांनी एकोप्याने राहावे आणि समाजाच्या प्रगतीसाठी हातभार लावावा. ईदच्या या मंगलमय प्रसंगी सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.
या शुभेच्छांमुळे परिसरातील मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****************************

Post a Comment
0 Comments