Type Here to Get Search Results !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांचा सत्कार

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांचा सत्कार



उदगीर (प्रतिनिधी) भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्या वतीने उदगीर येथील आ.संजय बनसोडे यांच्या संपर्क कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा भेट देवुन माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला.

मागील सहा वर्षाच्या आमदारकीच्या काळात आमदार संजय बनसोडे यांनी सर्व जाती धर्मांना समान न्याय देऊन उदगीर मतदार संघात एक नवा पॅटर्न निर्माण केला असुन त्यांच्या दूरदृष्टीने मतदारसंघाचा चौफेर विकास होऊन उदगीरचे नाव जगभरात पोहोचल्याने त्यांचा हा विशेष सन्मान करण्यात आला आहे.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी उपसभापती रामराव बिरादार, जिल्हा परिषद सदस्य प्रा.दिलीपकुमार मटके, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर बिरादार येणकीकर, प्रा.श्याम डावळे, वसंत पाटील, नरसिंग शिंदे, स्वच्छता सभापती राजकुमार हुडगे, नगरसेवक अनिल मुदाळे, नगरसेवक, शिवकुमार कांबळे, नगरसेवक अमर सुर्यवंशी, अबरार पठाण, बार्टीचे समतादुत पद्माकर कांबळे, सदाविजय पवार, सदाबहार पवार, राम बनसोडे, दयानंद गायकवाड, प्रदीप कांबळे, रतन सुर्यवंशी, गौतम गायकवाड, किरण कांबळे, गणपत वाघमारे, गणेश कांबळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments