"उदगीर नगरपरिषदेद्वारे नगराध्यक्ष स्वाती हुडे यांच्या पुढाकाराने उदयगिरी किल्ला स्वच्छता मोहीम संपन्न
उदगीर (एल पी उगिले) येथील ऐतिहासिक ओळख असलेला “उदयगिरी किल्ला” म्हटले की आठवते दिनांक ३ फेब्रुवारी १७६० रोजी निजामाविरुद्धची लढाई, मराठा सैन्याने यशस्वीरीत्या जिंकून फत्ते केली. त्या ऐतिहासिक विजयाला आता २६६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर उदगीर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.स्वातीताई सचिन हुडे यांच्या संकल्पनेतून आणि मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाने बुधवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२६, सकाळी ८:०० वा. “उदयगिरी किल्ला” परिसरात स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात आली होती.
यासाठी शहरातील नागरिक, सामाजिक संस्था, विविध मंडळे, क्लब, विद्यार्थी तसेच सर्व उदगीरवासीयांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनास हातभार लावावा, असे आवाहन नगरपरिषद कार्यालयाद्वारे करण्यात आले होते. त्याला उदगीरच्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सर्वप्रथम सदर स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ उदगीरकरांचे श्रद्धास्थान श्री उदालिक बाबा यांच्या संजीवन समाधी चे पूजन नगराध्यक्षा सौ.स्वातीताई सचिन हुडे, उपनगराध्यक्षा सौ.शितल नरसिंग शिंदे, स्वच्छता व शिक्षण सभापती राजकुमार हुडगे, नगरसेविका सौ.निकिता अंबरखाणे, सौ.मंजुश्री बनसोडे, नगरसेवक अनिल मुदाळे, व्यंकटराव बोईनवाड, अमरनाथ सूर्यवंशी,शिवकुमार कांबळे यांच्या शुभहस्ते करून आणि उदालिक बाबा समाधी मंदिराजवळील स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर उदयगिरी किल्ला परिसरातील कचरा, काटेरी झुडपे, अनावश्यक वाढलेली काटेरी गवत, हे काढून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला.
या स्वच्छता मोहिमे मध्ये नगरपरिषद कार्यालयाचे सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता कर्मचारी, सामाजिक संस्था कारवा फाउंडेशन, माऊली ग्रुप, रोडी कपडा बँक, जेष्ठ नागरिक संघ, यांच्या सह गणेश गायकवाड, डॉ.चंद्रकांत कोठारे, मुकरम जहागीरदार, इब्राहिम शेख, ओमकार गांजुरे, गुंडाप्पा समगे, विरकुमार अंबरखाने, शिवलिंग मठपती, मुरलीधर जाधव, खुर्शीद सिद्धिकी आदींनी मोठ्या प्रमाणात सक्रीय सहभाग घेवून “उदयगिरी किल्ला” स्वच्छता मोहीम यशस्वी केली.

Post a Comment
0 Comments