Type Here to Get Search Results !

श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेमध्ये वार्षिकोत्सव 2026 उत्साहात संपन्न

 श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेमध्ये वार्षिकोत्सव  2026  उत्साहात संपन्न

       


 

 उदगीर( प्रतिनिधी) : येथील  श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था द्वारा संचलित सर्व आस्थापनाचा एकत्रित वार्षिकोत्सव  2026 कार्यक्रम दिनांक 11 फेब्रुवारी 2026 या रोजी श्यामलाल क्रीडा संकुलच्या मैदानात   संपन्न झाला.       

       या कार्यक्रमाचे अध्यक्ष   श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुपोषपाणि आर्य होते.  तर प्रमुख उद्घाटक म्हणून बिदर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते ईश्वर सिंह ठाकुर, कर्नाटक आर्यप्रतिनिधीचे अध्यक्ष संजय मिस्किन, माजी उपसभापती उमरगा दिलीप सिंह गौतम, उदगीर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे, ॲड गुलाब पटवारी,  संस्था सचिव विक्रम संकाये, संस्था सहसचिव अंजुमनीताई आर्य,    डॉक्टर विश्वनाथ उपे, राजू दादा, ॲड एस टी पाटील, राजकुमार गिरवलकर, प्राध्यापक सुरेश राजमने,  प्रभा राजमन, साधना गिरवलकर, रमाकांत चतनाळे, तृप्ती ज्ञाते,  ओमकार गांजुरे ,शालेय समिती सदस्य पंडित सुकनिकर, भागवत घोळवे, रेणुका चटनाळे , यशवंत पेपरचे संपादक  रामभाऊ मोतीपवळे, लोकमन वर्तमानपत्राचे ज्येष्ठ पत्रकार रवी हसरगुंडे, नगरसेवक मनोज पुदाले,  अमर सूर्यवंशी राजकुमार होडगे, नगरसेविका भारतीताई सुधीर भोसले, गोकर्ण गणेश गायकवाड , वर्षा पंकज कांबळे, अंजली सावन पस्तापुरे, विद्या आनंद बुंदे, संध्या ओम गांजुरे,  शेख हिना मुक्रम जागीरदार माजी नगरसेवक गणेश गायकवाड, ॲड.दत्ताजी पाटील , श्यामलाल विद्यालयाचे मुख्याध्यापक भारत खंदारे श्यामार्य कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण भोळे श्यामलाल प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विवेक उगिले, श्यामलाल बालवाडीच्या संयोजिका अवंतिका मोरतळे, शिवाजी विद्यालय रोहिण्याचे मुख्याध्यापक आनंद चौबळे,पर्यवेक्षक विजयकुमार बैले, पर्यवेक्षक राहुल लिमये,  आदी मान्यवर उपस्थित होते.

          या    वार्षिकोत्सव  मध्ये चित्रकला, विज्ञान प्रदर्शन, भित्तीपत्रक विशेष सांस्कृतिक कार्यक्रम , फॅशन शो, खाऊ गल्ली  ई. खास आकर्षण असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी ,पालक व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

             श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था संचलित श्यामलाल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, श्यामार्य कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, श्यामलाल प्राथमिक विद्यालय, श्यामलाल बालवाडी, या आस्थापनातील बालवाडी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी या वार्षिकोत्सव अभिव्यक्ती 2026 मध्ये जवळपास 350 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता. 

            कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन व श्रीफळ फोडून करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते हुतात्माभाई श्यामलालजी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

 श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था ही उदगीर शहरातील सर्वात जुनी व ऐतिहासिक आणि आर्य समाजाची विचारावर चालणारी  संस्था आहे. हैदराबाद संस्थान निजामाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी भाई शामलालजी आणि बन्सीलालजी यांनी या बिदर्स परिसरातील सर्व भागात हिम्मत, प्रेरणा ,संघटन धर्म संस्कृती, प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी युवांना प्रेरक भाषणे देत असत. जुलमी रजाकराच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी अनेक युवकांना त्यांनी संघटित केले. हैदराबाद मुक्ती साठी भाई बन्सीलालजी यांनी थेट दिल्ली गाठत तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची भेट घेतली होती. ज्यांच्या नावावर ही संस्था चालते त्यांचे वंशज श्री सुपोषपाणी आर्य आपल्या पिढीचे कार्य ते अखंडपणे चालवत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे उद्घाटन प्रसंगी ईश्वर सिंह ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बिदर कर्नाटक व आंध्र प्रदेशातील हिंदू हृदय सम्राट समजले जाणारे व प्रति बाळासाहेब ठाकरे अशी उपाधी असलेले उद्घाटक ईश्वर सिंह ठाकुर यांनी आपल्या वक्तव्यातून उपस्थित सर्वांची मने जिंकली.

       आमच्या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात. प्रत्येक विद्यार्थिनीला सर्व उपक्रमासाठी एक व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य या संस्थे कडून केले जाते. असे अध्यक्षीय समारोपातून  संस्था अध्यक्ष सुपोषपाणी आर्य  यांनी मनोगत व्यक्त केले.

         संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता खादीवाले, उमाकांत सूर्यवंशी, महेश हुलसुरे, तर उद्घाटनाचे सूत्रसंचालन श्रीहरी निडवंचे कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक प्रवीण भोळे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments