Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या रासेयो वार्षिक शिबिराचे उद्घाटन संपन्न

 महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या रासेयो वार्षिक शिबिराचे उद्घाटन संपन्न



उदगीर – महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजने (रासेयो)च्या शाश्वत विकासासाठी युवक जलसंधारण व्यवस्थापन, ओसाड भूमी विकास व वार्षिक विशेष श्रमसंस्कार युवक शिबिराचे उद्घाटन मौजे एकुरका रोड, ता. उदगीर येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संपन्न झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून आनंदवाडीचे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानोबा चामे उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, माजी समाज कल्याण सभापती मधुकर एकुरकेकर, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, उपसरपंच कल्पेश जाधव, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सचिव रामकिशन जाधव, पोलीस पाटील विश्वास नरले, तंटामुक्तीचे अध्यक्ष गणेश जाधव, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी विनायक पाटील, ग्रामपंचायत सदस्य नितीन गुंडरे, प्रा. महादेव स्वामी, पत्रकार रसूल पठाण व विद्यापीठ प्रतिनिधी ऋषिकेश गायकवाड यांचा समावेश होता. यावेळी बोलताना सेवानिवृत्त गटविकास अधिकारी विनायक पाटील म्हणाले, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाने या परिसरात शिक्षणाचा पाया घातला असून, रासेयोच्या माध्यमातून सामाजिक जाणीव निर्माण होते. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. ज्ञानोबा चामे म्हणाले, गावकरी एकत्र आल्यानंतर गावाचा कायापालट होऊ शकतो. स्वतःच्या गावातील उदाहरणे देत विद्यार्थ्यांना ग्रामविकासासाठी परिश्रम करण्याचे आवाहन केले. मधुकर एकुरकेकर यांनी सांगितले, रासेयो शिबिरासाठी ग्रामस्थांकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. समारोपात अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर म्हणाले, रासेयो शिबिरातून सहजीवनाचा आनंद घेऊन जीवन समृद्ध करण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांनी याचा उपयोग करून जीवन घडवावे. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी केले. सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. बी. एस. होकरणे यांनी तर आभार प्रा. प्रवीण जाहुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. एन. डी. वगशेट्टी, प्रा. डॉ. एस. एन. भद्रशेट्टे, प्रा. डॉ. अर्चना मोरे, प्रा. प्रिया बळवंत, भगवान बिरादार यांच्यासह विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments