मनोजदादा पुदाले मित्रमंडळाच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार
उदगीर : येथील नवनिर्वाचित नगराध्यक्षा स्वाती सचिन हुडे व सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा मनोजदादा पुदाले मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी नूतन अध्यक्षा स्वाती सचिन हुडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, मनोज पुदाले,माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, युवा नेते सचिन हुडे, सुधीर भोसले, नंदकुमार नळंदवार, अमोल निडवदे, विजय निटुरे, अमोल अनकल्ले, उत्तरा कलबुर्गे,सरोजा वारकरे, मंदाकिनी जिवणे, शामला कारामुंगे यांच्यासह भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी बोलताना मनोज पुदाले यांनी निवडून आलेल्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून सामान्य जनतेचे हित जोपासेल यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
नगराध्यक्षा स्वाती सचिन हुडे यांनी सत्काराला उत्तर देताना शहरातील जनतेनी आपल्यावर विश्वास टाकला तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगत सर्व नगरसेवकाना सोबत घेऊन शहराचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

Post a Comment
0 Comments