श्री मेट्रो ब्रेन अबॅकस अकॅडमीची राज्यस्तरीय परीक्षेत उत्तुंग भरारी
उदगीर प्रतिनिधी :
उदगीर शहरातील श्री मेट्रो ब्रेन अबॅकस अकॅडमीने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप राज्यस्तरीय पातळीवर उमटवली आहे. लातूर येथे 28 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या 9 व्या राज्यस्तरीय अबॅकस परीक्षेत या अकॅडमीच्या 33 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये तब्बल 20 विद्यार्थ्यांनी टॉपर रँक पटकावत घवघवीत यश मिळवले, तर 13 विद्यार्थ्यांनी टार्गेट पूर्ण करून ट्रॉफी मिळवण्याचा मान पटकावला आहे.
विशेष बाब म्हणजे, ही अकॅडमी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने उत्कृष्ट निकाल देत आहे. मागील वर्षातही श्री मेट्रो ब्रेन अबॅकस अकॅडमीचे विद्यार्थी टॉप लेव्हलपर्यंत पोहोचले होते. अनेक विद्यार्थ्यांनी ट्रॉफी व मेडल मिळवून अकॅडमीचा नावलौकिक वाढवला होता. तसेच या अकॅडमीतील एक विद्यार्थी ‘नॅशनल ग्रँड टॉपर’ या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता, ही बाब अकॅडमीच्या गुणवत्तेची साक्ष देणारी आहे.
या यशामागे अकॅडमीच्या संचालिका अश्विनी व्यंकटेश पेन्सलवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, मेहनत व शिस्तबद्ध अध्यापन पद्धती महत्त्वाची ठरली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना 2025 चा ‘बेस्ट अबॅकस टीचर अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
ZR कॅटेगिरीमधून वेदांश सांगवे, वेदिका शेटकार, अथर्व कोमटे,
Z कॅटेगिरीमधून भक्ती जाधव, श्रीशैल हैबतपुर, श्रद्धा बिरादार, संस्कार कोरे, रोहन वडजे, समृद्धी पाटील, काव्या बोथीकर, स्वरांजली सिद्धेश्वरे या विद्यार्थ्यांनी टॉपर रँक पटकावली आहे.
A कॅटेगिरीमधून एकदंत चिद्रेवार, सार्थक बिबराळे, स्वप्निल बिबराळे, श्रीनिधी पेन्सलवार, अन्वी वट्टमवार, अर्पिता नालटे,
B कॅटेगिरीमधून देवांश पेन्सलवार, समृद्धी गव्हाणे, अन्वी हजारे यांनी टॉपर रँक मिळवली आहे.
तसेच आराध्या मोरे, दक्ष बावगे, अनिरुद्ध पाटील, गुरु कळसे, केतकी वीर, कपाळे शिवम हरनाळे, रक्षिता दासरवार, स्वरा कोटापल्ले, साईनाथ जाधव, भक्ती निमलवाड, अंजली जाधव, श्रीनिवास पेन्सलवार यांनी टार्गेट पूर्ण केल्याचा मान पटकावला आहे.
C कॅटेगिरीमधून केतक पेन्सलवार याने टॉपर रँक पटकावली आहे.
या सातत्यपूर्ण यशामुळे श्री मेट्रो ब्रेन अबॅकस अकॅडमी ही उदगीर परिसरातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी एक अग्रगण्य संस्था म्हणून ओळख निर्माण करत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालक, शिक्षकवर्ग व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment
0 Comments