रामदास बेंबडे मैदानात उतरले अन् ५२ लाखांचा विकासनिधी खेचून आणला!
लोहारा ,सोमनाथपुर गटातील गावाच्या विकासासाठी खेचून आनला निधी
उदगीर प्रतिनीधी
उदगीर तालुक्यातील लोहारा व सोमनाथपूर जिल्हापरीषद गटातील आनेक गावाच्या विकासासाठी ५२ लाखांचा निधी भाजपा तालुकाध्यक्ष रामदास बेंबडे यांच्या प्रयत्नातून आनल्याने या गावातील विकासानिधीला चालना मिळणार आहे.त्यामूळे उदगीर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा तालुकाध्यक्ष रामदास बेंबडे यांच्या पुढाकारातून विविध गावांसाठी एकूण ५२ लाख रुपयांचा विकास निधी मंजूर झाला आहे. हा निधी पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती रामदास बेंबडे यांनी दिली.
या विकास निधीतून उदगीर तालुक्यातील गुडसुर पंचायत समिती गण, तोंडार गण तसेच लोहारा जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. रस्ते, स्मशानभूमी सुशोभीकरण व पाणीसाठा दुरुस्ती यांसारख्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.
निधीचे नियोजन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे
इस्मालपूर येथे १० लक्ष रुपयांचे पेव्हर ब्लॉक व १० लक्ष रुपयांचा सिमेंट रस्ता,
तोंडार गावातील सिमेंट रस्त्यासाठी १० लक्ष रुपये,
कल्लूर येथील स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी १० लक्ष रुपये,
अनुपवाडी येथील पाझर तलाव दुरुस्तीसाठी ८ लक्ष रुपये,
क्षेत्रफाळ येथील सिमेंट रस्त्यासाठी ४ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या विकासकामांमुळे ग्रामीण भागातील दळणवळण, स्वच्छता व पाणी व्यवस्थापन सुधारण्यास मोठी मदत होणार असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात सकारात्मक बदल होईल, असा विश्वास रामदास बेंबडे यांनी व्यक्त केला. भाजपा सरकार ग्रामीण विकासासाठी कटिबद्ध असून पुढील काळात आणखी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
............................
पालकमंञी,माजीमंञी व माजी जिल्हापरिषद अध्यक्षांचे मानले आभार
हा ५२ लक्ष रुपयाचा विकासनिधी जो आला आहे तो विकासनिधी लातुरचे पालकमंञी शिवेंद्रसिंहराजे भोसले,माजी मंञी आ.संजय बनसोडे व माजी जिल्हापरिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांचे त्यांनी विशेष आभार भाजपा तालुकाध्यक्ष रामदास बेंबडे यांनी मानले.यांच्यामूळेच हा विकासनिधी आल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले

Post a Comment
0 Comments