ज्ञान विकास विद्यालयातील शिक्षकांची राज्यस्तरावर निवड
उदगीर प्रतिनिधी शिक्षणातील गुणवत्ता वाढीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ पासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत दि. २७ डिसेंबर रोजी लातूर येथे विभागस्तरीय ऑलिंपियाड स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धेत ज्ञान विकास विद्यालय, पाटोदा (बु.) येथील सहशिक्षक श्री रमेश शेंडगे यांनी मराठी ऑलिंपियाडमध्ये विभागस्तरावर प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली. तसेच सहशिक्षक श्री उमाशंकर जाधव यांनी गणित ऑलिंपियाडमध्ये घवघवीत यश संपादन करून राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश केला आहे.
एकाच शाळेतील दोन शिक्षकांची राज्यस्तरावर निवड झाल्याने शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाबद्दल संस्थेचे सचिव श्री धनराज जाधव, मुख्याध्यापक श्री शरद मोरे तसेच सुप्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य चंद्रशेखर कळसे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments