खेळामुळे व्यक्तीच्या शरीरासह मानसिक बळ मिळते - तहसीलदार -बोरगावकर.
उदगीर/ प्रतिनिधी,
मैदानी खेळ खेळल्यामुळे विद्यार्थ्यांचे शरीर तर मजबूत होतेच शिवाय मानसिक दृष्टया सुद्धा सकारात्मक परिणाम होतात. असे मत उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर यांनी पत्रकारांच्या वतीने मातृभूमी महाविद्यालयामध्ये अजिंक्य खेळाडुंचा सत्कार कार्यक्रमात व्यक्त केले.
यावेळी मातृभूमीच्या प्राचार्या श्रीमती उषा कुलकर्णी , केंद्रप्रमुख मारोती लांडगे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यस्तरीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद पद पटकावलेला गजेंद्र पांचाळ , राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पधेत प्रथम आलेल्या कु. नुपुर रामदास मलवाडे व महिल शिक्षका अर्चना शेवाळे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
पुढे बोलताना बोरगावकर म्हणाले की, अनेक छोटे छोटे देश सुद्धा मैदानी खेळात मोठ्या प्रमाणात प्रगती केलेले आपण पाहतो .पण आपला देश त्या दृष्टीने खुप मागे असून त्यात महारष्ट्र व महाराष्ट्रात आपला मराठवाडा तर खुपच मागे आहे. त्यामुळे मैदानी खेळाला महत्व देणे गरजेच असून ती काळाजी गरज असल्याचे सांगतले. अलिकडे मैदानी खेळ खुपच कमी झाले असून अनेक ठिकाणी मैदानचं शिल्लक राहिले नसल्याची खंत यावेळी व्यक्त करताना अनेक पालकांना असे वाटते की , मूलं खेळण्यात वेळ घालवला तर शिक्षणात कमी पडतात पण एरवादा खेळाडू जर कोणत्याही खेळामध्ये राज्य, राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर जर विशेष कामगीरी केली तर , त्यांना वर्ग एकच्या पदासह अनेक विभागात स्पर्धा परिक्षा शिवाय सरळ नियुक्ती देण्याची पद्धत आपल्या शासनात तरतुद असल्याचे शेवटी म्हणाले. व कार्यक्रमाच्या शेवटी खेळाडूंचे विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
. यावेळी पत्रकार विनायक चाकुरे , बबन कांबळे, सुनिल हवा, सुनिल मादळे ,प्रभुदास गायकवाड , सिद्धार्थ सुर्यवंशी , शेख इरफान हाणमत केंद्रे , महादेव गोणे, मंगेश सुर्यवंशी , निवृत्ती जवळे , शिंदे,संदिप निडवदे, आदि पत्रकारांसह श्रीमती अरुणा पांचाळ साहित्यिक रामदास केदार,अमजद पठाण, रामदास मलवाडे सर, शेवाळे सर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन शिवशेट्टे तर आभार प्रा. बिभीषण मद्येवाड यानी मानले.

Post a Comment
0 Comments