Type Here to Get Search Results !

नगर परिषदेच्या निवडणुकीत जातीधर्माचा विचार न करता युतीच्या उमेदवारांना निवडून द्या : माजी मंत्री आ.संजय बनसोडे*

 *नगर परिषदेच्या निवडणुकीत जातीधर्माचा विचार न करता युतीच्या उमेदवारांना निवडून द्या : माजी मंत्री आ.संजय बनसोडे*



*म.फुले नगरच्या प्रचार सभेत आ. संजय बनसोडे यांचे आवाहन*


उदगीर : उदगीरचा आमदार म्हणून गेल्या सहा वर्षांपासून काम करत आहे. या काळात कधीही जातीधर्माचा विचार केला नाही. प्रत्येकाच्या सर्वसामान्य माणासच्या विकासासाठी काम केले आहे. आगामी काळात मतदारांनी जातीधर्माचा विचार न करता नगर परिषदेच्या निवडणुकीत युतीच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी केले.

ते उदगीर नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने युतीचे अध्यक्षपदाचे उमेदवार स्वाती सचिन हुडे यांच्यासह प्रभाग क्रमांक 9, 10 व 11 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ म. फुले नगर भागात प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री आ. बनसोडे बोलत होते. 


यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी जि.प. सदस्य राहुल केंद्रे, माजी उपाध्यक्ष रामभाऊ तिरुके,माजी जि.प.सदस्य बसवराज पाटील कौळखेडकर,  नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.स्वाती हुडे, माजी नगरसेवक सचिन हुडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, भाजपाचे महामंत्री अमोल निडवदे, श्याम डावळे, उदय मुंडकर, प्रकाश राठोड,शिवकुमार कांबळे, संघशक्ती बलांडे, समद शेख, पंडित सुर्यवंशी, सुनिल केंद्रे, सतिश केंद्रे, चंद्रशेखर पाटील, इब्राहिम देवर्जनकर, मधुमती कनशेट्टे, वैशाली कांबळे, काजल मिरजगावे, सुनिता तेलंग, आदी उपस्थित होते.


यांच्यासह नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्वाती सचिन हुडे, प्रभाग क्र. 1, 9,10 व 11 मधील महायुतीचे उमेदवार अनुक्रमे प्रभाग १ चे मंजुश्री शशिकांत बनसोडे, धीरज कसबे, प्रभाग ९ चे वर्षा पंकज कांबळे, जवाहरलाल बन्सीलाल कांबळे, प्रभाग १० नुरजहाँ इस्माईल शेख, निवृत्ती सांगवे, प्रभाग ११ चे फैजुखाँ पठाण, शहाजहाँ बेगम रहिमखाँ शेख यांची उपस्थिती होती. 


यावेळी बोलताना नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्वाती सचिन हुडे म्हणाल्या, लहानपणापासूनच जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून सामाजिक कार्य करण्याची आवड आहे. या निवडणुकीत उदगीरच्या विकासासाठी बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन केले. 

यावेळी  पुढे बोलताना माजी मंत्री आ. संजय बनसोडे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत या भागातील मतदारांनी भरघोस पाठींबा देऊन निवडून दिला. शहरात भव्य दिव्य बौद्ध विहार उभारण्यासोबत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचे काम करून आंबेडकर प्रेमी नागरिकांचे स्वप्न पूर्ण केले. पुढील काळात उदगीर शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वाती हुडे यांच्यासह नगर सेवक पदाच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन केले. विधानसभा निवडणुकीत भाजपा कार्यकर्त्यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी युती केले असल्याचेही यावेळी आ. संजय बनसोडे यांनी सांगितले.


यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे म्हणाले, बौध्द विहार उभे करून उदघाट्नासाठी राष्ट्रपती महोदय या भागात येऊन गेल्या. हा ऐतिहासिक क्षण केवळ आ. संजय बनसोडे यांच्यामुळे घडू शकला असे सांगत, उदगीर जिल्हा निर्मिती साठी आवश्यक असणारी अनेक कार्यालये उभे करण्याचे काम आ.संजय बनसोडे यांनी केले असल्याचे सांगुन उदगीरच्या विकासाला गेल्या पाच वर्षात गती मिळाली असून विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी नगर परिषद आ. बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली युतीच्या ताब्यात देण्याचे आवाहन केले. 


प्रचार सभेचे प्रास्ताविक प्रा. श्याम डावळे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. शिवाजी देवनाळे यांनी केले.


यावेळी फुलेनगर सह प्रभागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments