*मी केलेला विकास हा केवळ जनतेच्या आशिर्वादामुळेच : माजी मंत्री आ.संजय बनसोडे*
*रेल्वे गेट जवळ ३५ कोटी रुपयाचा उड्डान पुल करणार*
उदगीर : माझ्या मंत्री व आमदारकीच्या काळात उदगीर शहराच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढून शहराला भौतिक सुविधे बरोबरच सांस्कृतिक मेजवानी देऊन उदगीर शहराचे नाव जगाच्या नकाशावर आणले ते केवळ उदगीर मतदार संघातील जनतेने दिलेल्या मतदान रुपी आशिर्वादामुळेच म्हणून या विकासाचे श्रेय हे माझ्या जनतेचे असल्याचे मत माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर नगर परिषद निवडणूक २०२५ च्या
प्रभाग १२, १३ व १४ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजीत प्रचार सभेत बोलत होते.
यावेळी माजी आ.गोविंद केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी जि.प. सदस्य राहुल केंद्रे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.स्वाती हुडे, सचिन हुडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, अमोल निडवदे, उमेदवार सौ.विद्या बुंदे, साईनाथ चिमेगावे, नरसिंग शिंदे, शितल शिंदे, अनिल मुदाळे, मनकर्णा मुदाळे, आनंद बुंदे, अमरनाथ सुर्यवंशी, वसंत पाटील,
भाजपाचे शहराध्यक्ष अमोल अनकले, डाॅ.प्रकाश येरमे, प्रा.श्याम डावळे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी, उदगीर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभाग 12 प्रभाग 13 प्रभाग 14 येथील युतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन करून येत्या काळात उदगीर शहराला स्मार्ट सिटी करून महाराष्ट्रात एक नंबरची नगरपालिका म्हणून नावलौकिक वाढवणार असल्याचे सांगितले शहरातील मूलभूत सुविधे बरोबरच विविध आरोग्याच्या सोयी सिटी बस अभ्यासिका केंद्र उभारणार असून केंद्र शासन व राज्य शासनाचा निधी खेचून आणून उदगीरचा कायापालट करणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी रिपाई या युती पक्षाच्या शहरातील सर्व उमेदवार व नगराध्यक्ष यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी केले.
यावेळी प्रभागातील नागरीक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*************************

Post a Comment
0 Comments