Type Here to Get Search Results !

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर महामानवांची प्रेरणा घेवुन जीवन जगा : माजी मंत्री आ.संजय बनसोडे*

 *जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर महामानवांची प्रेरणा घेवुन जीवन जगा :  माजी मंत्री आ.संजय बनसोडे*


*उदगीर* : आपल्या सर्वांवर विश्वरत्न, भारतरत्न प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे आपण सर्वजण एकोप्याने राहत असुन ही सर्व पुण्याई भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तथागत भगवान गौतम बुद्धांचा मार्ग दाखवला. आपण सर्वजण महामानवांचीच प्रेरणा घेवुन आपल्या जीवनाची वाटचाल केली तर आपण जीवनात यशस्वी होवु असे मत माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. 


उदगीर शहरातील किल्लागल्ली येथील

श्रावस्ती बौद्ध विहारच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.


पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, 

मी सर्वसामान्य कार्यकर्ता ते राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मिळाली. आपण दिलेल्या संधीचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या दारापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्याचे काम मी मागच्या सहा वर्षात केले असून यापुढेही जनतेच्या सेवेसाठी कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी दिली.

लाखो रुपयाचा निधी देवून किल्लागल्ली येथील श्रावस्ती बुध्द विहाराची निर्मिती केली आहे. बुध्द विहाराची वास्तु ही मनाला समाधान देणारी आहे. आपण सर्वांनी दररोज या विहारात येवून बुध्द वंदना घेवुन आपल्या पुढच्या पिढीवर चांगले संस्कार करावेत. सर्व महापुरुषांचा विचार आपल्या मुलांना देवुन त्यांच्या मनात त्यांचे विचार रुजवावे व देशाच्या हितासाठी त्यांना चांगले नागरीक बनवावे असे त्यांनी सांगितले.

मागील काळात जळकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जागा उपलब्ध करुन दिली. महात्मा बसवेश्वर, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे उभारले आता उदगीर शहरात 

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पुर्णाकृती पुतळा उभारत असुन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने मुख्य रस्त्यावर १५ कोटींचे भव्य स्मारक उभारत आहोत. येत्या ३० आॅक्टोबर रोजी विश्वरत्न, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य - दिव्य पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. 

याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, धाराशिवचे खा.ओमप्रकाशराजे निंबाळकर, लातूरचे खा.डाॅ.शिवाजी काळगे, आ.विक्रम काळे, आ.सतिश चव्हाण, आ.अमित देशमुख, आ.संभाजी पाटील निलंगेकर, आ.अभिमन्यू पवार, आ.रमेश कराड, आदी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी तालुका क्रीडा संकुल, जिल्हा परिषद मैदानावर जाहिर सभा व महाराष्ट्राचा महागायक आदर्श शिंदे यांचा भिमगीताचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास आपण सर्वांनी मोठ्या संख्येने पांढरे वस्त्र परिधान करुन उपस्थित रहावे असे माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.


यावेळी भंते धम्मबोधी करडखेल,

प्रदेश सरचिटणीस अॅड.व्यंकट बेद्रे, माजी उपनगराध्यक्ष फैजुखाॅ पठाण, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे,शफी हाशमी, राजकुमार चव्हाण, 

 अनिल मुदाळे, फय्याज शेख, लक्ष्मीबाई चव्हाण, बंडु कांबळे, अॅड. मारोती चव्हाण, बाबासाहेब सुर्यवंशी, अविनाश गायकवाड, धिरज वाघमारे, गणेश मादळे, अजय पारखे, बालाजी रणदिवे, अमर कांबळे, हिफ्जुरहेमान हाशमी, धनाजी शिंदे, कपिल मादळे, प्रभु सुर्यवंशी, सरुबाई मादळे, शारदा मटके, किरण गुप्ता, भारतबाई शेकापुरे, सुंदराबाई बोडके, शाहुबाई वाघमारे, विमल वाघमारे, विजया वाघमारे, शिला मटके, अनिता सोनकांबळे, साधना मटके 

आदी उपस्थित होते.

यावेळी किल्लागल्ली येथील समाजबांधव व नागरीकांसह शहरातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****************************

Post a Comment

0 Comments