*विश्वरत्न, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा भव्य - दिव्य करणार : माजी मंत्री आमदार संजय बनसोडे*
*शहरात मोठ्या प्रमाणात रोषणाई करुन संपुर्ण शहर सजवणार*
*उदगीर* : विश्वरत्न, भारतरत्न प.पु. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुर्णाकृती पुतळा उदगीर शहरात उभारावा अशी गेल्या अनेक दशकापासुनची समाजबांधवांची मागणी होती. त्यांच्या मागणीचा विचार करुन पुतळा उभारला असुन विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य - दिव्य पुतळ्याचे येत्या ३० आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर तालुका क्रीडा संकुल, जिल्हा परिषद, मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मतदार संघातील सर्व समाज घटकातील नागरिकांना निमंत्रण देवून आमंत्रित करणार असल्याचे माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.
ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा व स्मारकाच्या अनावरण व विविध कामांच्या लोकार्पण सोहळया निमित्त समाज बांधवांच्या आयोजीत बैठकी प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, धाराशिवचे खा.ओमप्रकाशराजे निंबाळकर, लातूरचे खा.डाॅ.शिवाजी काळगे, आ.विक्रम काळे, आ.सतिश चव्हाण, आ.अमित देशमुख, आ.संभाजी पाटील निलंगेकर, आ.अभिमन्यू पवार, आ.रमेश कराड, आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी भंते नागसेन बोधी, मनोहर कांबळे, माजी नगराध्यक्षा उषा कांबळे,श्रीरंग कांबळे, दिलीप कांबळे, देविदास कांबळे, दयानंद शिंदे, एस.डी. कांबळे, विद्यासागर डोरनाळीकर, श्याम डावळे, बालाजी भोसले, वसंत पाटील, सय्यद जानीमियाँ,शशिकांत बनसोडे, अनिल मुदाळे, सी.एम. कांबळे, महेश पाटोदेकर, व्यंकट नेत्रगावकर, सुशिलकुमार शिंदे, राजकुमार भालेराव, सुनिल सोमवंशी, संगम टाले, विलास शिंदे, दिलीप मटके, राहुल कांबळे, लहु कांबळे, रमेश धर्माधिकारी, मदन तुळजापुरे, अॅड. वर्षा कांबळे, वैशाली कांबळे, मंदा पुणेकर, किशाबाई कांबळे, माया कांबळे, नवनाथ गायकवाड, बाबासाहेब सुर्यवंशी, शिवकुमार कांबळे, जवाहरलाल कांबळे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी,
मराठवाड्यातील एकमेव भव्य दिव्य पुतळा म्हणून आपल्या उदगीर येथील बोधिसत्व भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याची नोंद होईल या दृष्टीने आपण काम करत आहोत. यावेळी विश्वशांती बुध्द विहाराच्या परिसरात सुशोभिकरण व त्यानंतर भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने भव्य दिव्य सिंगापुरच्या धर्तीवर उद्यान उभारणार असुन त्याचेही भुमीपुजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन धम्म परिषदेच्या नियोजनानुसार करुन हा कार्यक्रम भव्य दिव्य करु . यावेळी माझ्या सर्व समाजबांधवांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करुन कार्यक्रमास अतिशय शिस्तीने यावे असे आवाहनही केले.
येत्या सात दिवसात विश्वरत्न, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा भव्य - दिव्य होणार असुन आपण सर्व जाती - धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहान करुन या बैठकीत पुतळा अनावरण सोहळा संबंधी सर्व तयारीचा आढावा आ.संजय बनसोडे यांनी घेतला.
यावेळी उदगीर शहरातील व परिसरातील समाजबांधव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***************************

Post a Comment
0 Comments