पर्यावरण संवर्धनाबद्दल प्रा बिभीषण मद्देवाड यांचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते सत्कार
उदगीर प्रतिनिधी, प्रा बिभीषण मद्देवाड यांनी केलेल्या वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन कार्याबद्दल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या संकल्पनेतून उदगीरच्या उपविभागीय कार्यालय परिसरातील बगीचा विकास , वृक्षारोपन, व पर्यावरण संवर्धनाचे काम मातृभूमी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या ५० विद्यार्थ्यासमवेत तीन दिवस श्रमदान प्रा बिभीषण मद्देवाड यांनी केले . त्यांच्या पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपण कार्याचा सन्मान जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे याच्या हास्ते उदगीर येथिल उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित सेवा पंधरवाडा सेवा सप्ताह जनतेच्या हितासाठी समर्पित समाजहितासाठी एक पाऊल पुढे कार्यक्रमावेळी करण्यात आला यावेळ उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे ,तहसिलदार राम बोरगावकर ,नायब तहसिलदार महसुल अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते .
प्रा बिभिषण मद्देवाड यांचे रंगकर्मी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक ,आरोग्य , पर्यावरण ,सांस्कृतिक क्षेञात चांगले काम आहे. या सन्मानाबद्दल मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतिश उस्तुरे , प्राचार्या उषा कुलकर्णी यांच्यासह सामाजिक शैक्षणिक ,सांस्कृतीक पञकारिता क्षेञातील मान्यवरांकडून अभिनंदन केले आहे.

Post a Comment
0 Comments