कामगारांच्या मुलाचा अपघाताने गळा चिरला!! तिथे मदतीला स्वप्निल अण्णा जाधव धावला!!
उदगीर (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे मादलापूर येथील बांधकाम कामगार संजय सूर्यवंशी यांच्या घरावरील पत्रे टाकताना अपघात झाला अपघाती इतका मोठा होता की पत्रा गळ्याला लागून गळा चिरला गेला अशा कठीण परिस्थितीतही उदगीर येथील शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने मदत करून यशस्वी शस्त्रक्रिया केली त्यामुळे या गरीब कामगाराला जीवदान मिळाले मात्र घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने औषध पाण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नसल्याने कामगारांचे नेते माधव शेळके यांनी या घटनेची सविस्तर माहिती उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघातील युवा नेते स्वप्निल अण्णा जाधव यांना सांगितली. गोरगरिबांचे आणि विशेषतः कामगारांचे कैवारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वप्नील अण्णा जाधव यांनी कोणतीही मोठ्या राजकीय पदावर नसताना देखील स्वतःच्या घामाचा दाम गरीब कामगाराच्या मुलाच्या उपचाराला हातभार लावणारा ठरावा या उद्देशाने मागचा पुढचा कसलाही विचार न करता औषध पाण्यासाठी तातडीने स्वप्नील अण्णा जाधव यांनी मदतीचा हात पुढे करून या दांपत्याला तात्काळ आर्थिक मदत पाठवून दिली आहे. कोणत्याही पदावर नसताना देखील स्वप्निल अण्णा जाधव यांनी केलेले हे मोठे काम आणि मदत पाहून मन भारावून आले असे विचार माधव शेळके यांनी व्यक्त केले आहेत. एका महिन्यात तीन कामगारांच्या मदतीला धावून येणारा युवा नेता म्हणून स्वप्नील अण्णा जाधव यांचे कौतुक सर्वत्र केले जात आहे.

Post a Comment
0 Comments