Type Here to Get Search Results !

! मराठवाड्यात होऊन गेले शूरवीर ऐकून घेऊ त्यांची गाथा... लावून घेऊ आपल्या माथा.. !!

 !! मराठवाड्यात होऊन गेले शूरवीर ऐकून घेऊ त्यांची गाथा... लावून घेऊ आपल्या माथा.. !!



17 सप्टेंबर म्हणजेच डोळ्यासमोर मराठवाड्यातील असंख्य शूर वीर हिंदू धर्मातील मावळ्यांनी दिलेलं बलिदान देऊन दीलेला लढा उभा केलेलीं चळवळ त्यांचं कार्य कीतीतरी अनमोल होतं ते माझ्या आजोबांनी विठ्ठलराव मारोतराव चिखले त्यांनीही लढ्यामध्ये सामील होऊन भूमिगत असलेल्या मावळ्यांना राणा वनात घेऊन जात असलेल्या भाजी भाकरीची गाठोडे पाठीवर लादून पाणी घेऊन जात असत अशाच काहीशा योगदानाबद्दल बालपणी जीवन जगत असताना त्यांच्या सहवासात राहून मी ऐकलेल त्या सर्व गोष्टी आजोबांनी सांगितलेली शब्द ना शब्द मला आपोआपच आठवायला लागतात स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाडा मुक्त झाला पाहिजे म्हणून दीलेल योग्यदान त्यातील काही जणांच्या बलिदानाने हा मराठवाडा मुक्ती संग्राम दीन म्हणून साजरा करून आपण त्यांच्या ... आठवणींना उजाळा देतोय हे येणाऱ्या भावी पिढीसाठी गरजेचे आहे गेले ते दीवस राहील्या त्या आठवणी असं मुळीच चालणार नाही ... माझं बालपण आजोबा सोबत बोटाला धरून चालायला लागलो सोबतीला राहून उठता बसता तेव्हा त्यांच्या तोंडून व सोबतीला मित्रांच्या गप्पा गोष्टी ऐकायला मिळाल्या म्हणून मला निजामाचा दिलेरखान लाडका तसेच विश्वासू सेनापती असलेला भाडखाऊ भढवा लफंगा कासीम रीझवी या हारमखोराने सुरू केली तीच ती रझाकार चळवळ ....

  हारामखोराच्या रझाकारीने... मराठवाड्यातील जनतेमध्ये भयंकर असं अक्राळ-विक्राळ स्वरूपाचं भेस धारण करून विविध अत्याचार हा मराठवाड्यातील खेड्यापाड्यातील वाड्या वस्त्या मध्ये वास्तव्य करून रहातं असलेल्या आपल्या आया-बहिणीच्या माय-माऊलींच्या इज्जतीचा पंचनामा करून वेशीला टांगले होतं ... चावडीवर अनेक हिंदू धर्मातील महिलांच्या इज्जतिचे लचके तोडून टाकले जाऊ लागले त्यांना लुटत होता... एवढ्यावर असतो थांबला नाही तर त्याच्या सोबत आपल्या लहान लहान मुला मुलीचे दिवसाढवळ्या उचलून नत त्यांच्या इज्जतिचे लचके तोडून टाकले जाऊ लागले सोबतीला घेऊन जाऊं लागलें तसेच शेतकऱ्यांना वर्षेभर उदार निर्वाह व्हावे म्हणून काबाडकष्ट करून पिकवून ठेवलेल्या शेतातील अन्न धान्य घरातील सोनं नाणं जमा पुंजी पैसा आडका निजामाच्या हातात पडले जमेल तेवढे खेड्यात पाड्यातील वाड्या.. वस्त्यांमध्ये जाऊन शहरातील हवेलीच्या हावेल्या दिवसा ढवळ्या लुटपाट करत असत अशा अनेक जाच जुलूम हारामखोर भाडखाऊ भढव्या.. कासीम रीझवी च्या रझाकारीला... मराठवाड्यातील जनता त्रासली होती किती दिवस सहन करावा... मराठवाड्यातील जनता खूप त्रस्त झाली होती याला वाचा फोडलीच पाहिजे म्हणून मराठवाडा मुक्ती मिळाली पाहिजे म्हणून 1938 रोजी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात हजारो मराठवाड्यातील मावळ्यांना घेऊन हैदराबाद गाठले तिथूनच खरी लढ्याला सुरुवात झाली होती निजामाने स्वामीजींना कोठडीत टाकले थोड्या दिवसांनी तीन-चार महिन्यात सोडण्यात आले इकडे छत्रपती शिवरायांनी गनिमी काव्याचा वापर करून औरंग्याला सळो की पळो करुन सोडले होते व गड किल्ले जिंकून घेऊन... हे सर्व विसरणारे ते हिंदू मावळे कसले.. ते गप्प बसणार कसले... ते पेटून उठले आपल्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर. बीड. जालना .परभणी. नांदेड धाराशिव लातूर भागातील मावळे पेटून उठले त्यातील प्रामुख्याने पुढाकाराने मावळ्यांना घेवुन वामनराव नाईक केशवराव मोरटकर माणिकराव पहाडे शंकर भाई पटेल बाबासाहेब परांजपे गोविंदभाईजी श्राफ यांनी मुख्य प्रचारकाची भुमिका घेऊन मावळ्यांना जमवण्याचे कार्य केलं नांदेड जिल्ह्यातील सिताराम पप्पू यांनी (शस्त्र- अस्त्र जमावण्याचं मोलाचं कार्य केलं) बाबासाहेब वेलणकर गुरुजी ( हिप्परगा येथील शाळेत राहून आसपासच्या परिसरातील तरुणांच्या.. तुकड्या निर्माण करून सहकार्य केले ) देविसिंग चव्हाण. साहेबराव लहानकर. माणिकचंद पहाड. मुकुंद पेडगावकर काशिनाथ राव जाधव यांचं अनमोल असं योगदान विसरता येणार नाही एवढेच नव्हे तर अशी अनेक....नावे घेता येईल..मग या लढ्यात आपलं उदगीर ... पण् काही मागे राहिलेल नाहीये आपल्या आजूबाजूच्या परीसरात खूप मोठ्या चकमकी झाल्या त्या मुर्की लगत डोनगावच्या सिमावरतीभागात खुप मोठी चकमकी झाल्या आहेत.. याचं चकमकीत लपवून छपून भुमिगत राहूनच सुरू केलेली चळवळ त्या चळवळींचे किस्से हे किशनराव पाटील पंढरीनाथ तिरूके दादा यांचा सहवास लाभला आहे त्यांच्याकडून खूप काही ऐकायला मिळाले हे माझं भाग्य समजतो यामुळे मनातील त्या चकमकी जाग्या झाल्या शिवाय राहणार कशा... त्या डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहणार नाहीत हे ही तितकेच खरे आहे... आता 17 सप्टेंबर म्हणलं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे तर काही विचारवंतांच्या , नातवंडांच्या, स्वतंत्र सैनिकांना ... त्यातीलच एक-दोन जिवन जगत असलेल्या स्वतंत्र सैनिकांना आठवणी जाग्या झाल्या शिवाय... आपन आपला सगा सोयरा मित्र यार यांनी दिलेलं बलिदान तेही उपाशी तपासी राणा वनातील झाडाझुडपात ...दरी डोंगरात राहून पाऊस सोबतीला सोसाट्याच्या वारा गारा खाऊन लढणारा हा मावळा शत्रूशी दोन हात करत लढा देता देता स्वतंत्र मिळवण्यासाठी झूंज देऊन तोंडाजवळ विजय आणुन त्यांना विरमरण पत्करून सर्व सोडून गेल्यामुळे...पडलेली चेहरेही बघायला मिळतात मला आठवत असलेली आपल्या भागातील आप्पाराव पाटील कवळखेड किशनराव पाटील तोंडचिरकर पंढरीनाथ रामचंद्र तिरूके दादा दत्तू सिंग गुरुजी तोंडचिरकर वामनराव जाधव ग्यानबा जाधव पटवारी पाटील पांडे घराणे तोडांरकर मराठवाड्यातील मुक्ती संग्रामात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाग नोंदवलेल्या सर्वच महान् विभुतीच्या कार्याला सलाम...शत शत नमन करून नतमस्तक होऊन सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देतो 

लेखक कवी समाजसेवक 

विजय ( विराज) शिवाजीराव चिखले शेल्हाळकर ता उदगीर जिल्हा लातूर 

9049200070

Post a Comment

0 Comments