लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करून घ्यावी
जिल्हा सरचिटणीस सिकंदर भैय्या शेख
उदगीर प्रतिनिधी''
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे लाभ मिळावा याकरिता https://ladakibahin.maharashtra .gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाडक्या बहिणींनी पुढील दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस सिकंदर भैय्या शेख यांनी केले. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनातर्फे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरण आर्थिक साहाय्य दिले जाते. महिला व बालविकास विभागाकडून ई केवायएसी माध्यमातून लाभार्थीचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभअसून, महिला स्वतःच्या मोबाइलवरून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतील,अशी प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. त्यामुळे लाभार्थीनी पुढील दोन महिन्यांत स्वतःहून ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी,कोणत्याही अमिषाला बळी पडू नये,असे आवाहनही शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस सिकंदर भैय्या शेख यांनी केले आहे..

Post a Comment
0 Comments