साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त खिचडी अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन
उदगीर, दि. 01 ऑगस्ट 2025 –
श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्ट आणि वीर अंजनेय जीम यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त अन्नदानाचा (खिचडी वाटप) कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि सामाजिक एकतेच्या वातावरणात संपन्न झाला.
या उपक्रमाचे आयोजन दरवर्षी जयंती निमित्ताने करण्यात येते आणि यंदाही परंपरेप्रमाणे दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता, आशिषभाऊ अंबरखाने यांच्या दुकानासमोर, मोठ्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीत खिचडी वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास परिसरातील नागरिक, प्रतिष्ठानचे सदस्य, युवक मंडळाचे कार्यकर्ते, महिला, लहान मुलं यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. सामाजिक सलोखा, समानता व सहकार्य याचे दर्शन घडवणारा हा उपक्रम दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अत्यंत आनंदात पार पडला.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रचार आणि सामाजिक समरसतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम भविष्यातही अशाच जोमाने आयोजित केला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments