Type Here to Get Search Results !

शास्त्री विद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी संपन्न

 *शास्त्री विद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी संपन्न*



*उदगीर*-( प्रतिनिधी)  लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.


व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश मातेकर ,स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकरराव लासूणे, कु. सई राऊत प्रमुख पाहुण्या ज्योती शिंदे, अपूर्वा शेंडगे पर्यवेक्षक कृष्णा मारावार ,किरण नेमट माधव मठवाले,अभ्यास पूरक मंडळ प्रमुख अनिता यलमटे निलेश मांडवकर कार्यक्रम प्रमुख आशा गौतम व शैला सांगवीकर उपस्थित होते.

 

 कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्योती शिंदे यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा वेध घेतला.विद्यार्थिनी अपूर्वा शेंडगे हिने अण्णाभाऊ साठे यांनी दलित आणि उपेक्षित लोकांच्या हक्कासाठी लढा दिला ते थोर समाज सुधारक कवी आणि लेखक होते त्यांनी फकीरा, वैजयंता यासारख्या अनेक प्रसिद्ध साहित्यकृती निर्माण केल्या असे सांगितले.


यानंतर सायली देशमुख व तन्वी बोळेगावे ,सिद्धांत व वेदांत मोरखंडे

या विद्यार्थिनींनी पोवाडा सादर केला .


अध्यक्षीय समारोपामध्ये ज्ञानेश मातेकर यांनी लोकमान्य टिळक व  अण्णाभाऊ साठे यांच्या अलौकिक कार्यावर प्रकाश टाकला.   विद्यार्थिनी सई राऊत हिने लोकमान्य टिळक हे प्रभावी वक्ते आणि पत्रकार होते. त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली त्यांनी स्वदेशी, बहिष्कार,राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चतु:सूत्रीचा पुरस्कार केला असे विचार व्यक्त केले.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साधना बजगीरे स्वागत व परिचय यशश्री चिद्रे व श्रावणी तेलंगे सूत्रसंचालन श्रुती मदने व चैतन्या कांबळे  अपेक्षा जामकर या विद्यार्थिनींनी  केले .कार्यक्रमाची सांगता कल्याण मंञाने  झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी व सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments