Type Here to Get Search Results !

लातूरच्या व्यवसायिकांचे धाबे दणाणले मनपाची प्लास्टिक विरोधातील मोहीम दणक्यात

 #लातूरच्या व्यवसायिकांचे धाबे दणाणले मनपाची प्लास्टिक विरोधातील मोहीम दणक्यात



२ टन प्लास्टिक जप्त मनपाकडून गोदामावर छापे पाच लाखाचे प्लास्टिक जप्त


लातूर (प्रतिनिधी)


लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक विरोधातील मोहीम दणक्यात सुरू आहे. या अंतर्गत मंगळवारी(दि. २६) पालिकेकडून प्लास्टिकची साठवणूक करणाऱ्या गोदामावर छापे मारण्यात आले. यात अंदाजे पाच लाख रुपयांचे २ टनहुन अधिक प्लास्टिक जप्त करण्यात आले.विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत या प्लास्टिकची मोजदाद सुरू होती. त्यामुळे जप्त केलेल्या प्लास्टिकचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.


शहरात सिंगल युज प्लास्टिक वापरास बंदी आहे.असे असतानाही काही व्यावसायिक व नागरिकांकडून हे प्लास्टिक वापरले जाते. त्यामुळे मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांच्या आदेशानुसार पालिकेने गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिक जप्त करण्याची मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे संबंधितांना आर्थिक दंडही केला जात आहे.


या मोहिमेअंतर्गतच मंगळवारी शहरातील गोदामावर छापे मारण्यात आले. मनपा उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांच्या उपस्थितीत मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेख, स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे व सर्व मुख्य स्वछता निरिक्षक यांनी ही कारवाई केली. यात सिंगल युज प्लास्टिकचा मोठा साठा हाती लागला. सुमारे २ हजार किलो अर्थात २ टनाहुन अधिक प्लास्टिक जप्त करण्यात आले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत या प्लास्टिकची मोजदाद सुरू होती.मंगळवारी जप्त करण्यात आलेले प्लास्टिक अंदाजे साडेचार ते पाच लाख रुपयांचे आहे.


प्लास्टिकचा वापर वाढत आहे. व्यावसायिक आणि नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी या प्लास्टिकचा वापर बंद करावा,असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिक व व्यावसायिकांनी प्लास्टिक वापर बंद केला नाही तर पालिकेची ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा पालिकेकडून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments