*महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती व ग्रंथपाल दिन साजरा*
उदगीर – महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात 12 ऑगस्ट 2025 रोजी पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती व ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन दिनविशेष समिती व ग्रंथालय विभागाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ग्रंथपाल प्रा. लक्ष्मीकांत पेन्सलवार यांनी स्वागत व प्रास्ताविकपर भाषणातून डॉ. रंगनाथन यांच्या कार्याचा आढावा घेतला व विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वातावरणात वाचनाविषयी जागरूकता व प्रेरणा निर्माण करणारा हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Post a Comment
0 Comments