उदगीर...... येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयाचे नेतृत्व गुण विकास शिबीर नागुरे मंगल कार्यालयात संपन्न झाले.
शिबीरासाठी अध्यक्ष म्हणून शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे तर,प्रमुख पाहुणे म्हणून डॉ प्रशांत सुभाषराव राजूरकर-सदस्य भा.शि.प्र.संस्था,अंबाजोगाई व श्रीमती निता मोहनराव मोरे- सहशिक्षिका ला.ब.शा.मा.विद्यालय, उदगीर तसेच शंकरराव विश्वनाथआप्पा लासुणे-केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भा.शि.प्र.संस्था,अंबाजोगाई तथा स्थानिक समन्वय समिती कार्यवाह, मधुकरराव गुंडप्पा वट्टमवार-अध्यक्ष स्थानिक समन्वय समिती,अंकुश गोरोबा मिरगुडे-मुख्याध्यापक ला.ब.शा.प्रा.वि.उदगीर यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच विभाग प्रमुख सुधाकर पोलावार, श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी व अभ्यासपूरक मंडळ प्रमुख माधव अण्णाराव केंद्रे उपस्थित होते.
व्यासपीठावरील मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करुन शीबीराचे उद्घाटन करण्यात आले.सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
शिबीराचे प्रमुख पाहुणे डॉ प्रशांत राजूरकर यांनी शाळेने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे नेतृत्व गुण विकास शिबीराचे आयोजन केले त्याबद्दल शाळेचे अभिनंदन केले.लहान वयातच जर मुलांना नेतृत्वाचे संस्कार दिले तर कायमचे रुजतील आणि निश्चितच भावी पिढी सुदृढ, निरोगी व देशाचे नेतृत्व करणारे नागरिक तयार होतील.भविष्यात विविध क्षेत्रात नेतृत्व करायचे असेल तर आपल्या आरोग्याची काळजी लहान वयापासून केली पाहिजे.त्यासाठी आयुर्वेदानुसार आपली दिनचर्या व ऋतूचर्या पाळा.मोबाईलचा मोह कायमचा टाळा व पॅकेजिंग फुड खाणे टाळा.बलवान शरीर व प्रसन्न मन ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायाम व ध्यानधारणा करावी.स्वत:ची कामे स्वतः करा.उत्तम आरोग्याशिवाय उत्तम नेतृत्व निर्माण होऊच शकत नाही.अन्नमय कोषातून नेतृत्व विकासाची संधी मिळते,असे सविस्तर मार्गदर्शन केले.
शिबीराच्या दुसऱ्या प्रमुख पाहुण्या निता मोरे यांनी
तुमच्यामधून भावी नेते,भावी पिढी घडविण्यासाठी नेतृत्व गुण शीबीराचे आयोजन करणारी एकमेव आपली भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आहे.जे भारतीय आहे त्याची जपणूक करा.वर्गप्रतिनिधी कसा असावा.वर्ग मंत्रिमंडळाची कार्य याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.सारखी तक्रार करणारा कुठलेही नेतृत्व करु शकत नाही.आपल्या सोबत किती लोकं असतात त्यावरुन आपले यश अवलंबून असते.सर्वांना सोबत घेऊन चला,असे मार्गदर्शन केले.
स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार यांनी या वयापासूनच विद्यार्थ्यांनी नेतृत्वाचे गुण आत्मसात केले पाहिजे.आपल्या नेतृत्वाने मोठे झालेल्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा नामोल्लेख केला.तुम्हीही त्यांच्याप्रमाणे नेतृत्व करुन शाळेचे,समाजाचे,देशाचे नाव उज्ज्वल करा,असे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे यांनी केवळ चांगले दिसण्याणे,पैशाने नेतृत्व गुण विकसित होत नसतात तर,त्यासाठी सर्वांनी मिळून मिसळून वागावे, सर्वांना समजून घ्या,एकमेकांना मदत करा.आपल्यातील चांगल्या सवयीतूनच खरे नेतृत्व गुण विकसित होतील.सर्वांनी उत्तम नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी नियमितपणे व्यायाम करण्याचे आवाहन केले.
यानंतर शीबीरातील सहभागी विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले व त्यानंतर शारीरिक व बौद्धिक खेळ श्याम गौंडगावे,बलोपासक मंडळ प्रमुख सुधीर शिरपूरकर, सचिन आगलावे,माधव केंद्रे व तुकाराम पेद्दावाड यांनी घेतले.
प्रास्ताविक मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी केले.संपूर्ण शीबीराचे सुत्रसंचलन सचिन आगलावे यांनी केले.आभार माधव केंद्रे यांनी मानले.शीबीर यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments