नांदेड जिल्ह्यात मान्सूनची दमदार सुरुवात; नांदेड, लोहा, मुदखेड, अर्धापूर तालुक्यांत जोरदार पाऊस
नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून, अनेक भागात जोरदार सरी कोसळत आहेत. गुरुवारी जिल्ह्यातील पाच मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि. ८ ऑगस्ट) नांदेड, लोहा, मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यांत पावसाचा जोर कायम राहिला.
जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी १०.२० मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये नांदेड तालुक्यातील तरोडा मंडलात ६५.३० मिमी पाऊस होऊन अतिवृष्टी झाली. नांदेड शहर मंडलात ५७.५० मिमी, नांदेड ग्रामीण ६१.५० मिमी, लिंबगाव ३६.३० मिमी, विष्णुपुरी ३८.५० मिमी, नाळेश्वर ४७.३० मिमी, लोहा २९ मिमी, मुगट ३३.८० मिमी, दाभड ६१.५० मिमी, मालेगाव ३८.३० मिमी, अर्धापूर ३९.८० मिमी पावसाची नोंद झाली.
तालुकानिहाय आकडेवारीनुसार नांदेड ३९.४०, बिलोली ५.५०, मुखेड ०.४०, कंधार ७.१०, लोहा २०.७०, हदगाव ८.७०, भोकर १.७०, देगलूर ०.४०, किनवट ०, मुदखेड २५.४०, हिमायतनगर ०.३०, माहूर ०, धर्माबाद ०, उमरी ९.१०, अर्धापूर ३९.८०, नायगाव ६.८० मिमी पावसाची नोंद झाली.
काही तालुक्यांमध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा असली, तरी हवामान विभागाने पुढील काही दिवसांत जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

Post a Comment
0 Comments