Type Here to Get Search Results !

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती मोठ्या उत्साहात बाराळी येथे साजरी

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती मोठ्या उत्साहात बाराळी येथे साजरी ,,,,,,,,,,,,,,,,,


 मुखेड बाराळी प्रतिनिधी :-( प्रताप देवरे)

दिनांक चोवीस ऑगस्ट 2025 रोजी बाराहाळी नगरीमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. व शहरातील भव्य मिरवणूक काढण्यात आली असून 

 अण्णाभाऊ साठे यांचे विचार सातासमुद्रा पार गेले असून लेखणीच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य गोरगरीब शेतकरी कामगार वंचिताच्या व्यथा मांडून समाजाला स्वाभिमानाने जीवन जगण्याचे मार्ग दाखवणारे म्हणजे डॉक्टर अण्णा भाऊ साठे हे थोर पुरुष होऊन गेले आहेत त्यांनी फकीरा ही कादंबरी लिहिली तसेच पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून ही पृथ्वी कष्टकरांच्या शर्मिकांच्या तळहातावर तरलेली आहे,

 तसेच ये आजादी झुटी है मेरे देश की जनता भुकी है, 

जग बदल घालुनी घाव आम्हा सांगून गेले मज भीमराव, अशा विविध शायरी लेखणीच्या माध्यमातून समाजाला दिशा दाखवण्याचे काम अण्णाभाऊंनी केले आहे,

 यावेळी

 जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. जीवन देशमुख 

प्रमुख पाहुणे श्री. राजन देशपांडे हाणमंत मामा वाडीकर, सखाराम गुरुजी वाघमारे, व्यंकट पाटील उमाटे, पांडुरंग सावकार महाजन, व्यंकट वळगे,धोंडीराम पाटील अस्वले, अंतेश्वर कोल्हेवाड, सुभाष कांबळे, जाकीर शेख, राहुल पाटील उमाटे, दिलीप पाटील उमाटे,मगदूम शेख, खदीर तांबोळी, प्रभू गुरुजी, संपत गायकवाड सर, संजय सुगावकर, सचिन वाघमारे, रंजीत बाराहाळीकर, आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुक्रमाबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गंगनवारे , लुंगारे, होमगार्ड बीट जमदार, व मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता जयंती मंडळाचे अध्यक्ष बालाजी वाघमारे, उपाध्यक्ष माधव शिनगारे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अमोल वाघमारे सर , यांनी केले आहे न्यूज रिपोर्ट प्रताप देवरे मुखेड नांदेड

Post a Comment

0 Comments