उदगीर ( श्रीधर सावळे ) –
थोर साहित्यिक, समाजसुधारक आणि बहुजन चळवळीचे प्रवर्तक साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त आज उदगीर येथे विविध पक्ष संघटनांच्या वतीने आणि तहसीलदार राम बोरगावकर यांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कोटी कोटी प्रणाम अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक बन्सीला दादा कांबळे, बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार, छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे सतीश पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते बंटी कसबे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) चे सुशील कुमार शिंदे, ऍडव्होकेट चव्हाण, प्राचार्य नावंदरकर सर (लॉ कॉलेज), संतोष स्वामी, शिवाजी तिवारी, शंकर मामा सपनोरे, रवी डोंगरे, राजू पवार, गोरख वाघमारे, गोरख शेवाळे, सुनील पाटील यांच्यासह इतर अनेक मान्यवर, विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा गौरव केला आणि त्यांच्या सामाजिक विचारांना उजाळा देत, त्यांचा आदर्श घेऊन कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रम अतिशय उत्साही वातावरणात पार पडला असून, स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावून अभिवादन करण्यात आले.


Post a Comment
0 Comments