अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने सामाजिक ऋणातून उत्तराई होण्याचा प्रयत्न - स्वप्निल (अण्णा) जाधव
उदगीर (प्रतिनिधी) सामाजिक जाणीवा जपण्याचा महत्त्वाचा सल्ला साहित्यसम्राट, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी देशातील सर्व जनतेला दिलेला आहे. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. अशा पद्धतीच्या भूमिकेतून आपले परखड विचार मांडून आपल्या लेखणीतून कष्टकरी आणि सर्वसामान्य माणूस नायक बनवून उपेक्षित समाजातील दुःख चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न अण्णाभाऊंच्या लेखणीने केला आहे. अण्णाभाऊंची जयंती साजरी करत असताना कष्टकऱ्यांचे दुःख समजून घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. मी एका कष्टकऱ्याचा, कामगाराचा मुलगा असल्यामुळे मला त्या गोष्टीची जवळून जाणीव आहे. मी फार मोठा नाही, मात्र माझ्या वडिलांनी मला फार मोठी शिकवण दिली आहे. आपल्याकडे एक भाकरी असेल तर ती वाटून खाऊ या, अशा पद्धतीची शिकवण दिल्यामुळे मी सामाजिक जाणीव जपण्यासाठी आणि या समाजाने मला मोठे केले आहे. मला प्रेम दिले आहे. त्याची जाणीव ठेवून अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने महोत्सव साजरा करणाऱ्या सर्व प्रभाग आणि वार्डातील जयंती महोत्सव समितीच्या कार्यक्रमासाठी माझ्या वतीने फुल ना फुलाची पाकळी अर्थसहाय्य केली पाहिजे. या भावनेतून मी मदत केली आहे. ही मदत फार मोठी आहे असे मी म्हणत नाही, मात्र या कृतीतून मी माझी समाजाबद्दलची भावना व्यक्त केली आहे. आपल्या समाजाने सामाजिक जाणीव जपून जर काम केले तर एकोपा निर्माण होईल. त्यासाठी सर्वांनी शिक्षणाला प्राधान्य द्यावे. असेही आवाहन केले.
याप्रसंगी किल्ला गल्ली जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आकाश अंधारे, उपाध्यक्ष मुकेश कांबळे, सचिव अमर कांबळे तसेच अडत लाईन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रभागातील जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीमंत थोरात, सुग्रीव सोनकांबळे, भरत खुडे तर संजय गांधी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष साहिल गुंडीले, ज्ञानेश्वर कांबळे, बालाजी गंडारे, गोपाळ नगर भागातील जयंती महोत्सव समितीचे प्रेम कुमार कांबळे, आकाश शिंदे, रोहित वाघमारे, समता नगर जयंती महोत्सव समितीचे सुधाकर सूर्यवंशी, किरण गायकवाड, राहुल सोनकांबळे तसेच अशोक नगर जयंती महोत्सव समितीचे वसंतराव गोटमुकले, बबलू पांढरे, शेखर पांडेकर, येनकी मानकी रोड जयंती महोत्सव समितीचे ओमकार सूर्यवंशी, पवन लातूरकर, रवी गायकवाड, महात्मा फुले नगर जयंती महोत्सव समितीचे प्रेम यशवंत जगताप, नागेश सूर्यवंशी, बबलू मटके, गोविंद नगर जयंती महोत्सव समितीचे नतेश वाघमारे, व्यंकटेश तोरकडे, अमोल गुलफुरे, निडेबन वेस जयंती महोत्सव समितीचे बालाजी कारामुंगे, रमेश चौधरी, राहुल चौधरी, चर्च रोड जयंती महोत्सव समितीचे अनिकेत पांढरे, जीवन मोतेवाड, माधव कांबळे, गांधीनगर जयंती महोत्सव समितीचे सूर्यभान कांबळे, रेल्वे कॉलनी जयंती महोत्सव समितीचे अशोक किवंडे, शांतीलाल कांबळे, दिनेश कांबळे यांच्यासह फुलेनगर प्रभागातील जयंती महोत्सव समितीचे अमोल जाधव, महेश कांबळे, बबन सुळकेकर, नालंदा नगर जयंती महोत्सव समितीचे साहिल मसुरे, नरसिंग बेंद्रे, फुले नगर बागबंदी भागातील जयंती महोत्सव समितीचे मारुती कांबळे, अजय कसबे, बोधन नगर जयंती महोत्सव समितीचे मारुती गायकवाड इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना स्वप्नील (अण्णा) जाधव म्हणाले की, दीड दिवस शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंनी आपल्या अफाट कल्पनाशक्ती आणि वेदनेला लोकांच्या समोर मांडण्याची शैली याच्या बळावर जगावर आपला प्रभाव टाकतील एवढे मोठे लिखाण केले आहे. त्यांचे साहित्य जगभरातील वेगवेगळ्या भाषांतून भाषांतरित झाले आहे, होत आहे, होत राहील. तो आदर्श प्रत्येक तरुणांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाला प्राधान्य द्यावे. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे स्पर्धेत टिकायचे असेल तर ज्ञानाच्या मर्यादा वाढवा. जेणेकरून समाजामध्ये ताठ मानेने जगता येईल. समाजासाठी जे जे म्हणून करता येईल, ते ते करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे, परंतु माझ्याही काही मर्यादा आहेत. त्यामुळे तरुणांनी पुढे येऊन समाजाने आपल्यावर केलेल्या ऋणातून उतराई होण्यासाठी सामाजिक जाणीव जपाव्यात, असेही आवाहन त्यांनी केले आहे.


Post a Comment
0 Comments