Type Here to Get Search Results !

लातूर जिल्हयातील सर्व शाळा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या दुकानावर पोलिसांची धडक कार्यवाही....

 

लातूर जिल्हयातील सर्व शाळा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या दुकानावर लातूर पोलिसांची धडक कार्यवाही लातूर पोलिसांची धडक कार्यवाही....



पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यात चालणाऱ्या अवैध धंद्याविरुद्ध कठोर व प्रभावी कार्यवाही करणे संदर्भात सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना सक्त सूचना दिले आहेत.


त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 11/07/2025 रोजी सकाळी 10.00 ते 12.00 वाजण्याचे सुमारास एकाच वेळी अचानकपणे लातूर जिल्ह्यातील 23 पोलीस ठाणे हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालयाच्या 100 मिटर परिसरातील पानटप-या, किराणा दुकानांची 67 पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे. ज्या पानटप-या व किराणा दुकानामध्ये अवैध गुटखा तसेच तंबाखुजन्य पदार्थ मिळुन आले त्या पान टपऱ्या व किराणा दुकानावर भारतीय न्याय संहिता, (COTPA Act, 2003) म्हणजे 'सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरात बंदी आणि व्यापार, उत्पादन, पुरवठा आणि वितरण नियमन) कायदा, 2003 कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.


लातूर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून संपूर्ण लातूर जिल्ह्यात 67 पथके तयार करून महाविद्यालय, शाळा परिसरामधील अचानक छापेमारी केली व त्यामध्ये भारतीय


न्याय संहिता अन्वये 07 गुन्हे दाखल करण्यात आले असून 07 गुन्ह्यामध्ये गुटका व सुगंधित तंबाखू असा एकूण-05,63,517 रुपयाचा मुद्दमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच COTPA Act, 2003 प्रमाणे 149 कार्यवाया करण्यात आल्या आहेत.


सदर कारवाई दरम्यान 218 शाळांना महाविद्यालयाला भेटी देऊन शाळा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये असलेल्या 469 पानटपऱ्या, किराणा दुकान तसेच तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करून तंबाखूजन्य पदार्थ विकणारे दुकानावर कार्यवाही करण्यात आली आहे. सदर कारवाई करिता 53 अधिकारी व 245 पोलीस अमलदार यांची नेमणूक करून 67 पथके तयार करण्यात आली होती.


पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांचे आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात लातूर पोलिसांकडून कार्यवाही करण्यात आली असून सदरची तपासणी मोहीम ही नियमित पणे सुरू असणार असून शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री करणे खपवून घेतले जाणार नाही त्यांच्याविरुद्ध अधिक कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक लातूर यांनी दिला आहे

Post a Comment

0 Comments