श्रीकांत पाटील मित्र मंडळाच्या वतीने आकाश नागनाथ पांडे याचा सत्कार
उदगीर (एल पी उगीले)
महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेत मुख्याधिकारी या पदावर यश संपादन केलेल्या उदगीर तालुक्यातील तोंडार गावाचे भूमिपुत्र आकाश नागनाथ पांडे यांचा सत्कार समारंभ श्रीकांत पाटील मित्रमंडळाच्या वतीने विद्यार्थ्याच्या उपस्थितीत संस्कार गुरुकुल निवासी ज्ञानगृहात साजरा करण्यात आला, येथे श्रीकांत पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
श्रीकांत पाटील मित्र मंडळाचे अध्यक्ष सचिन वाघमारे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.निमंत्रिताचा सत्कार समारंभ प्रसंगी मुख्याधिकारी पांडे यांचे वडील नागनाथ पांडे यांनी मुलांना विशेष अभ्यासाच्या तंत्राविषयी कानमंत्र दिले, तर प्रमुख पाहूणे प्रा.सिद्धेश्वर पटणे सरांनी मित्र मंडळाच्या माध्यमातून होत असलेल्या अधिकारी वर्गाचा सत्कार समारंभाचे कौतुक केले, तर प्रा.सुर्यवंशी यांनी कवी कुसुमाग्रज यांची कणा ही कविता सादर करून मुलांना कष्ट व जीवनातील कठिण प्रसंगात कसे लढायचे यावर भाष्य केले,
या सोहळ्यात मंडळाचे मार्गदर्शक श्रीकांत पाटील,अध्यक्ष सचिन वाघमारे तसेच प्रमुख पाहुणे प्रा.सिद्धेश्वर पटणे,प्रा.बालाजी सुर्यवंशी,सत्कारमूर्ती मुख्याधिकारी पांडे,प्रशांत हुडगे, प्रविण पटवारी,प्रा. संग्राम मुंसाडे,विजय भोसले,सतीश बिरादार, मंगेश येरकुंडे तसेच मित्र परिवार व चिमुकली मुले उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. आभार प्रशांत हुडगे यांनी व्यक्त केल.

Post a Comment
0 Comments