Type Here to Get Search Results !

उदगीरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

 उदगीरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन



उदगीर ( श्रीधर जाधव) : ज्येष्ठ नागरिक संघ, उदगीर यांच्या महिला समितीच्या वतीने जागतिक महिला दिन-२०२६ निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील शुभंकर फंक्शन हॉल (दुसरा मजला, कॅप्टन चौक, देगलूर रोड) येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. शारदा दत्ता माने (जाधव) उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सौ. सुनीती अजय दंडवते या राहणार आहेत.

यावेळी उदगीर शहरातील विविध सामाजिक संस्थांमधून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक महिलांचा सन्मान करून गौरव करण्यात येणार आहे. तसेच महिला सबलीकरणाच्या दिशेने प्रेरणा देणारे मार्गदर्शनही या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच साहित्य क्षेत्रातील मान्यवर, महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments