Type Here to Get Search Results !

आ. अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्य ‘स्वच्छता व आरोग्याचा’ जागर

 आ. अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्य ‘स्वच्छता व आरोग्याचा’ जागर



लातूर (एल.पी. उगीले): 

राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा लातूर शहराचे लोकप्रिय आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लातूर शहरात 'स्वच्छता आणि आरोग्य' यांचा जागर करण्यात आला. विलासराव देशमुख फाउंडेशन आणि लातूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक १२ मध्ये 'माझा प्रभाग,स्वच्छ प्रभाग' या अभिनव संकल्पनेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी शहराला स्वच्छ ठेवणाऱ्या महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचारी व महिला कामगारांचा विशेष सत्कार करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने या 'स्वच्छता दूतांचा' मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ट्वेंटीवन ऍग्रो ग्रुपच्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

संविधान चौक ते दत्त मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम केवळ औपचारिक कार्यक्रम न घेता, विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने प्रत्यक्ष मैदानावर उतरून काम करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत संविधान चौक ते दत्त मंदिर या दरम्यान स्वच्छता करण्यात आली. साचलेला कचरा आणि सांडपाणी हटवून डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनिया सारख्या आजारांचे निर्मूलन करणे, कचरा वर्गीकरण करणे आणि विशेषतः लहान मुले व ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी "कचरामुक्त परिसर" ही संकल्पना यावेळी राबवण्यात आली.

लोकसहभागातून शहर सुंदर बनवण्याचा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ करताना महापौर जयश्री सोनकांबळे म्हणाल्या की, "शहराला सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्या साठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेला हा उपक्रम शहरासाठी आदर्श ठरेल." यावेळी उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, फाउंडेशनच्या विभाग प्रमुख संगीता मोळवणे, गटनेते विजयकुमार साबदे यांनीही समयोचित मार्गदर्शन केले.

या सोहळ्याला विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक सूर्यकांत कातळे, नगरसेवक धोंडीराम यादव, सतीश साळुंके, फिरदोस आरिफ शेख, बाळासाहेब (पप्पू) देशमुख, पवन सोलंकर, दत्ता सोमवंशी, आयुब मणियार, भालचंद्र सोनकांबळे, प्रविण सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. बी.एस. वाकुरे, प्राचार्य शिंदे, प्राचार्य साखरे, अविनाश देशमुख, डॉ. शिवाजीराव जवळगेकर, धर्मेंद्र मुन्ना शिंदे,नारायण कांबळे, गिरीश दिवेकर, संजय ओहोळ,नरसिंग घोडके, राजकुमार नामवाड, नागनाथ लोंढे, नागनाथ डोंगरे, पांडुरंग सावंत, आर.एन.कसबे, डी.एम.जगताप, संदीपान सूर्यवंशी, तुकाराम केदासे, प्रल्हाद साळुंखे, रवी कसबे, एल. आर. कांबळे, उर्मिला मुगळे, शुभांगी राऊत, रेखा शिखरे, मीना टेंकाळे,शोभा ओव्हळ, चंद्रमुनी कांबळे, संतोष नाईकवाडे, , अभंग चव्हाण, गोरख माळी, गजानन साळुंके, धनंजय शिंदे, अतुल माने, श्रीकांत कातळे, सुधीर जाधव, कुणाल कदम आणि जालिंदर बर्डे यांची उपस्थिती होती.

या मोहिमेत विलासराव देशमुख फाउंडेशनच्या फार्मसी, इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक कॉलेजमधील विद्यार्थी, शिक्षक वृंद तसेच परिसरातील नागरिक आणि महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

Post a Comment

0 Comments