उदगीरमध्ये किल्ला परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणीची मागणी; प्रशासनाला निवेदन सादर
उदगीर, प्रतिनिधी :
उदगीर शहरातील किल्ला परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा, या मागणीसाठी आज श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्ट, उदगीर यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी तसेच नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, छत्रपती संभाजी महाराज हे शौर्य, त्याग आणि धर्मरक्षणाचे प्रतीक असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी उदगीरच्या ऐतिहासिक किल्ला परिसरात भव्य पुतळा उभारणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे नव्या पिढीला इतिहासाची प्रेरणा मिळेल तसेच शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पडेल.
यावेळी श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्ट, उदगीरचे अध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली अभिजीत पाटील, अजय नवरखेले, शुभम लोणीकर, अजय कबाडे, कल्लाप्पा स्वामी, शुभम सुपारे, राजेश शेटकार, विशाल तोंडचिरकर, नितीश शिरसे, विष्णू लोणीकर, बळवंत चिंचोलकर, धनराज वाकुडे, कपिल वल्लापुरे, प्रशांत रंगवाळ आणि वैभव कोटलवार आदी उपस्थित होते.
सदर मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे व्यक्त केली आहे.


Post a Comment
0 Comments