Type Here to Get Search Results !

उदगीर नगरपरिषदेचा अतिक्रमणावर हातोडा

 उदगीर नगरपरिषदेचा अतिक्रमणावर हातोडा 



उदगीर (एल पी उगीले) उदगीर नगर परिषदेच्या निवडणुका संपन्न झाल्यानंतर नूतन नगराध्यक्ष आणि मुख्य अधिकारी यांच्या आदेशानुसार उदगीर शहरातील अतिक्रमणावर हातोडा सुरू झाला आहे. उदगीर शहरात वाढलेले अतिक्रमण आणि रस्त्याच्या दुतर्फा थांबलेले हातगाडी वाले आणि ठेले वाले यांच्यामुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा होत होता. या संदर्भामध्ये प्रसिद्धी माध्यमांनी वेळोवेळी ओरड करून देखील या गोष्टीकडे फारसे कोणी लक्ष देत नव्हते. मात्र निवडणुका संपन्न झाल्यानंतर नगरपालिकेकडून मोठा निर्णय घेऊन अतिक्रमण हटाव ची मोहीम राबवली जात आहे. 

उदगीर येथील भाजी मंडई परिसरात संध्याकाळच्या वेळी महिलांना आणि मुलींना भाजी घेण्यासाठी बाजारात जाणे देखील कठीण झाले होते. दुकानदाराचे दुकान समोर झालेले अतिक्रमण आणि दुसऱ्या बाजूला हातगाडीवाले, ठेलेवाले यांची गर्दी त्यातही रस्त्याच्या मध्यभागी करण्यात आलेली दुचाकीची पार्किंग यामुळे रस्ता अत्यंत अरुंद झाला होता. त्या रस्त्याला मोकळा श्वास घेण्याची संधी आता अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे मिळू शकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. एका बाजूला या अतिक्रमण हटामुळे काही लोक समाधान व्यक्त करत आहेत. तर काही लोक गोरगरिबांच्या रोजी रोटी वर गदा आणला जात आहे अशी उरळी करत आहेत. काही कार्यकर्त्यांनी तर चक्क अतिक्रमण हटाव ची खरी गरज मुख्य रस्त्यावर शिवाजी चौकात आणि पोलीस स्टेशन समोर किंवा डॉ. जाकिर हुसेन चौक अर्थात जुना उमा चौक या ठिकाणी सतत वाहतूक तुंबलेली दिसून येते. त्यामुळे रहदारीला मोठा अडथळा होत आहे. त्या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम न राबवता गल्लीबोळातील आणि भाजी मार्केट परिसरातील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाले असल्याने अनेक बागवानांनी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

समाजसेवी संस्था आणि काही नागरिकांनी नगर परिषदेच्या या अतिक्रमण हटाव मोहिमेचे कौतुकही केले आहे. 

"स्वच्छ उदगीर, सुंदर उदगीर, हरित उदगीर" या कल्पना नूतन नगराध्यक्ष सौ. स्वाती सचिन हुडे यांनी यापूर्वीही बोलून दाखवल्या होत्या. त्याप्रमाणे ही कारवाई केली जात असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

0 Comments