Type Here to Get Search Results !

ग्रामीण भागातील नागरिकांना सर्व सोई सुविधा पुरविणार : माजी मंत्री आ.संजय बनसोडे

 ग्रामीण भागातील नागरिकांना सर्व सोई सुविधा पुरविणार : माजी मंत्री आ.संजय बनसोडे



आपला लोकसेवक म्हणून जबाबदारीने काम करत आहे


उदगीर : शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी मी गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे आपला लोकप्रतिनिधी असलो तरी लोकसेवक म्हणूनच आज पर्यंत मी काम केले आहे. त्यामुळेच मंत्रिपदाच्या काळात मतदारसंघात विकासाचा डोंगर उभा करून शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना सर्व सोई सुविधा पुरविल्या असल्याचे मत माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.


ते उदगीर तालुक्यातील नागलगाव ग्रामपंचायतीच्या नुतन इमारतीचा भुमीपुजन सोहळ्या प्रसंगी बोलत होते.


यावेळी गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, नागलगावचे सरपंच सुभाष राठोड, उपसरपंच नेताजी कांबळे, प्रा.श्याम डावळे, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, नगरसेवक व्यंकट बोईनवाड, माजी सरपंच राजीव वाघे, अंकुश वाघे, सुर्यकांत चवळे, चेअरमन कलप्पा पाटील, बाळु गुरमे, ईब्राहिम देवर्जनकर, संग्राम मोरखंडे, अॅड. तात्या पाटील, गुणवंतराव पाटील, रामलिंग स्वामी, आदी उपस्थित होते.


पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी, मतदार संघातील प्रत्येक गावावर माझ लक्ष असल्याने ग्रामीण भागातील रस्ते, वीज, पाणी यासह विविध सभागृह यासाठी निधी उपलब्ध करून देवुन ग्रामीण भागाचा विकास केला आहे. नागलगाव येथील ग्रामपंचायतच्या इमारत बांधकामासाठी सुमारे 25 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून नविन इमारत बांधकाम होत आहे. भविष्यात सर्वसामान्याला या ग्रामपंचायतीमार्फत सर्व कागदपत्रे व सुविधा पुरविल्या जातील यासाठी निधी अपुरा पडल्यास आणखीन वाढीव निधी देणार असल्याचे आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले.


उदगीर ते देगलूर हा तब्बल ८१० कोटी रुपयाचा रस्ता मंजूर केला केला आहे. त्याही कामाला लवकरच सुरुवात होऊन आपल्या भागाचा विकास होणार आहे. मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी

या भागात एम.आय. डी. सी उभारणार आहे. मागील काळात सर्व जाती धर्मांना

सर्वांना सोबत घेवुन मतदार संघाचा विकास केला असुन मी मंत्री व आमदार असलो तरी केवळ आपला लोकसेवक म्हणून जबाबदारीने काम करत असल्याची ग्वाही आमदार संजय बनसोडे यांनी दिली.

यावेळी नागलगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****************************

Post a Comment

0 Comments