Type Here to Get Search Results !

उदगीर चौबारा परिसरात कुत्र्यांचा धुमाकूळ – युवक गंभीर जखमी, नागरिक त्रस्त

 उदगीर चौबारा परिसरात कुत्र्यांचा धुमाकूळ – युवक गंभीर जखमी, नागरिक त्रस्त



उदगीर शहरातील चौबारा परिसरात काल एका भटक्या कुत्र्याने युवकावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा नगरपरिषदेकडे तक्रारी व निवेदन दिले असतानाही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.


सध्या रस्त्यावर भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून, विशेषत: शाळकरी मुलांना शाळेत ये-जा करताना मोठा धोका निर्माण झाला आहे. पालकांमध्येही यामुळे तीव्र चिंतेचे वातावरण आहे.


नागरिकांचे म्हणणे आहे की, वारंवार निवेदनं देऊनदेखील नगरपरिषदेने उपाययोजना केल्या नाहीत तर गंभीर परिणाम उद्भवू शकतात. नागरिकांनी प्रशासनाला जाग येऊन तात्काळ प्रभावी कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.


नगरपरिषदेकडून त्वरित पावले न उचलल्यास उदगीरकरांचा आक्रोश आणखी तीव्र होईल, असेही नागरिक सांगत आहेत.

Post a Comment

0 Comments