प्रदेशाध्यक्ष मनोज दादा आखरे यांच्या वाढदिवशी संभाजी ब्रिगेडच्या उदगीर शहर अध्यक्षपदी बंटी भाऊ घोरपडे यांची नियुक्ती
उदगीर: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज दादा आखरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, त्यांच्या उपस्थितीत संभाजी ब्रिगेडच्या उदगीर शहर अध्यक्षपदी बंटी भाऊ घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली.
या खास दिवशी जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीने सर्व पदाधिकाऱ्यांचा हार घालून सन्मान केला. यावेळी तालुका अध्यक्षांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवश्री बंटी भाऊ घोरपडे यांनी पदभार स्वीकारला. जिल्हाध्यक्ष शिवश्री राजकुमार माने यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याला जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री उत्तमराव फड, जिल्हा सचिव शिवश्री मोहनेश्वर विश्वकर्मा, जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री बाळासाहेब चिंचोलकर, जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री श्रीधर जाधव, जिल्हा संघटक शिवश्री मेहबूब भाई सय्यद, जिल्हा संघटक शिवश्री रवानगावे, तालुका अध्यक्ष शिवश्री राजकुमार भालेराव, तालुका उपाध्यक्ष शिवश्री धम्मसागर सोमवंशी, तालुका कार्याध्यक्ष शिवश्री नरसिंग बनशेलकीकर, विधानसभा अध्यक्ष शिवश्री नागरगोजे यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments