Type Here to Get Search Results !

स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत तोंडचिर मार्फत महाश्रमदान संपन्न

 स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत तोंडचीर   मार्फत महाश्रमदान संपन्न 




उदगीर (एल पी उगीले) स्वच्छता ही सेवा 2025 अभियानांतर्गत मराठवाडा मुक्ती दिन अर्थात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी सार्वजनिक ठिकाणांचे स्वच्छता प्रबोधन पर उपक्रम, स्वच्छता लक्ष युनिट स्थापन करणे, स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण घटकांचे नूतनीकरण करणे, क्लीन ग्रीन उत्सव साजरा करणे, सफाई मित्र सुरक्षा शिबिर आयोजित करणे तसेच सर्वांनी एक दिवस श्रमदान करून श्रमप्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी एक दिवस एक साथ एक तास हा उपक्रम राबवत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे अंतर्गत महाश्रमदान शिबिर मोहीम राबवण्यात आली. याची सुरुवात उदगीर तालुक्यातील तोंडचिर ग्रामपंचायत येथून करण्यात आली. याप्रसंगी गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, कार्यक्रमाधिकारी सचिन पाटील, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बिराजदार, दंडे, आरोग्य विभागाचे वाघमारे, ग्रामपंचायत अधिकारी विनोद खरात, स्वच्छ भारत मिशनचे भागवत टेकाळे, महादेव माने, बालाजी जाधव, सुदर्शन पाटील तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य शाळेतील मुख्याध्यापक व कर्मचारी तसेच विद्यार्थी अंगणवाडी सेविका, अशा सेविका, गावातील युवक या सर्वांनी या महा श्रमदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. तसेच स्वच्छतेचे महत्व पटवून सांगताना वैयक्तिक स्वच्छता आणि परिसर स्वच्छता या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन उदगीर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांनी केले. 


स्वच्छता ही सेवा अशा पद्धतीचा उपक्रम सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती उदगीर मार्फत राबवला जातो आहे. या उपक्रमामुळे स्वच्छतेला गती आली आहे.

Post a Comment

0 Comments