अशोक स्तंभाच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा
उदगीर - शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील चौकात अशोक स्तंभ बसवण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा जाहीर केला आहे. आज, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राजकुमार भालेराव यांनी उपोषणस्थळी भेट दिली आणि उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून ही मागणी लवकरात लवकर मान्य करण्याची विनंती प्रशासनाकडे केली.
यावेळी बोलताना राजकुमार भालेराव यांनी, शहरातील नागरिकांची आणि उपोषणकर्त्यांची ही मागणी रास्त असून, प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही करावी, असे म्हटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी अशोक स्तंभ त्याच ठिकाणी बसवणे योग्य ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब चिंचोलकर, जिल्हा संघटक मेहबूबभाई सय्यद, तालुका उपाध्यक्ष धम्मासागर सोमवंशी, तालुका सचिव सावन तोरणेकर, तालुका कार्याध्यक्ष नरसिंग बनशेलकीकर, निडेबान शाखा अध्यक्ष शिवकांत गायकवाड, बाबासाहेब एकुर्केकर, ऍडव्होकेट सुशीलकुमार सोमवंशी आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments