Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय खाद्यतेल आणि तेलबिया अभियान अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न

 राष्ट्रीय खाद्यतेल आणि तेलबिया अभियान अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न




लातूर (प्रतिनिधी) लातूर जिल्ह्यातील अनसरवाडा येथे कृषी विभाग मांजरा कृषी विज्ञान केंद्र लातूर व अनसरवाडा ऑरगॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड मौजे अनसरवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय खाद्यतेल तेलबिया अभियान अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव पाटील यांच्या  प्रतिमेचे पूजन करून  करण्यात आले. राष्ट्रीय खाद्यतेल व तेलबिया अभियान अंतर्गत मूल्य साखळी भागीदार म्हणून अनसरवाडा ऑरगॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. या कंपनीची निवड करण्यात आलेली असून राष्ट्रीय खाद्यतेल व तेलबिया अभियान या योजनेअंतर्गत सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.या कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी l शिवसांब लाडके, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ सचिन डिग्रसे, संदीप देशमुख, मताई , तालुका कृषी अधिकारी नाथराव शिंदे, मंडळ कृषी अधिकारी निलंगा संतोष पाटील, हनुमंत पाटील, ठोंबरे, तालुक्यातील उपकृषी अधिकारी ,सहाय्यक कृषी अधिकारी, आत्मा यंत्रणेचे तुकाराम सुगावे, कंपनीचे चेअरमन विवेकानंद वाडीकर आणि राष्ट्रीय खाद्यतेल, तेलबिया अभियान अंतर्गत निवड झालेल्या सर्व शेतकरी गटातील अध्यक्ष, सचिव, सभासद, शेतकरी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाथराव शिंदे यांनी केले, शिवसांब लाडके यांनी सोयाबीन आणि तूर  पिक मर रोगाला बळी पडू नये म्हणून घ्यावयाची काळजी, याबाबत आणि शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले. सदरील योजने मुळे लातूर जिल्हा हा सोयाबीन लागवडीसाठी महाराष्ट्रामध्ये एक नंबर असल्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे हब तयार होणार आहे. असे मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे सचिन डिग्रसे यांनी सांगितले. सोयाबीन आणि तूर या पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन याबाबत मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे मताई यांनी सखोल मार्गदर्शन केले. सोयाबीन आणि तूर या पिकातील कीड व रोग व्यवस्थापन कसे करावे? याबाबत डॉ. संदीप देशमुख यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्या बरोबरच शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर करावा, जेणेकरून आपल्या जमिनीतील ऑरगॅनिक कार्बनचे प्रमाण वाढेल. आणि त्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल, असे सविस्तर मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलंगा येथील उपकृषी अधिकारी सुनील घारोळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आत्माचे तुकाराम सुगावे यांनी केले.

Post a Comment

0 Comments