Type Here to Get Search Results !

संभाजी ब्रिगेडचे लातूर जिल्हा (पूर्व) कार्याध्यक्ष शिवश्री बाळासाहेब चिंचोलकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*




उदगीर:  (श्रीधर सावळे )संभाजी ब्रिगेड लातूर जिल्हा (पूर्व) कार्याध्यक्ष शिवश्री बाळासाहेब चिंचोलकर यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ देऊन आणि सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याची ओळख असलेले पुस्तक भेट देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी संभाजी ब्रिगेड, उदगीरच्या पदाधिकाऱ्यांनी आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून बाळासाहेब चिंचोलकर यांच्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी उदगीर तालुका अध्यक्ष शिवश्री राजकुमार भालेराव, तालुका उपाध्यक्ष शिवश्री धम्मसागर सोमवंशी, तालुका कार्याध्यक्ष शिवश्री नरसिंग बनशेलकीकर, जिल्हा सचिव शिवश्री मोहनेश्वर विश्वकर्मा, तालुका संघटक शिवश्री सुरज आटोळकर माजी विधानसभा अध्यक्ष शिवश्री देवा भाऊ घंटे, माजी जिल्हा सचिव शिवश्री बाबासाहेब एकुर्केकर, माजी जिल्हा संघटक खाजा भाई शेख, माजी शहर अध्यक्ष रहिमभाई शेख हे उपस्थित होते.

तसेच, आंबेडकरी चळवळीतील मनमिळाऊ सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब सूर्यवंशी, शिवश्री महेश कांबळे, शिवश्री शिवकुमार कांबळे, अंकुश शेकेदार इत्यादी सदस्यांनीही बाळासाहेब चिंचोलकर यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उपस्थितांनी बाळासाहेब चिंचोलकर यांच्या नेतृत्वाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0 Comments