Type Here to Get Search Results !

गुरव समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न



उदगीर (प्रतिनिधी) येथील गुरव समाज संघटनेच्या उदगीर शहर शाखेच्या वतीने दहावी परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या जानवी जागृत पाटील ,श्रेया प्रमोद पाटील, आर्या दीपक पाटील यांचा सद्गुरु शंकरलिंगमहाराज मठात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व श्रावण महिन्यातील स्नेहभोजन कार्यक्रम घेण्यात आला. भगवान बिरादार, उपमुख्याध्यापक महात्मा फुले विद्यालय अहमदपूर येथे, पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर येथे प्रोफेसर पदी प्रा.डॉ. अनिल पाटील यांना, उदगीर पंचायत समितीमध्ये लिपिक पदी अनिता ठाकूर यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या सहाय्यक अभियंता वर्ग दोन, सार्वजनिक बांधकाम विभाग पदी गिरीश पाटील व मराठवाडा साहित्य परिषद देवणी शाखेच्या सहकार्यवाहपदी संगीता सोनाळे यांची निवड झाल्याबद्दल स्मृतिचिन्ह ,शाल व पुष्पहार व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी शामराव भडगे गुरुजी होते. प्रमुख पाहुणे कै.रामराव पाटील विद्यालय, दैठणा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक भगवानदास कुलकर्णी व जळकोटच्या इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालयातील सहशिक्षिका स्वाती होदरणे होत्या .यावेळी संत काशिबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना विद्यार्थ्यांनी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, ही बाब समोर ठेवून आपल्या आयुष्यात शिक्षण घेणे अत्यावश्यक आहे, तसेच सामाजिक माध्यमांपासून दूर राहून आपले व्यक्तिमत्व घडवावे. अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात भडंगे गुरुजी म्हणाले शहराच्या वतीने अतिशय स्तुत्य उपक्रम असून या उपक्रमामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते, आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना बळ मिळते अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन संदेश बोरुलकर यांनी केले. प्रास्ताविक प्रा. प्रवीण जाहुंरे यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास पाटील, बाळू पाटील ,प्रमोद पाटील, राहुल नाईकवाडे, विजय पाटील मुंडेवाडीकर ,किरण पाटील, नंदू एकदरे, नितीन आलमले, दीपक शिरुरे ,संजय बिरादार यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments