Type Here to Get Search Results !

श्री.श्री. १०८ श.ब्र. डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांचे ३० वा श्रावणमास मौन तपोअनुष्ठान २८ पासुन पुणे येथे

 श्री.श्री. १०८ श.ब्र. डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांचे ३० वा श्रावणमास मौन तपोअनुष्ठान २८ पासुन पुणे येथे



 उदगीर (प्रतिनिधी) श्री गुरु हावगीस्वामी संस्थानचे मठाधिश श्री.श्री. १०८ श.ब्र. डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांचे ३० वा मौन तपोअनुष्ठान सोहळा २८ जुलै पासुन १७ ऑगस्ट २०२५ दरम्यान पुणे येथे संपन्न होणार आहे.


श्रीगरु हावगीस्वामी मठ संस्थानचे मठाधिश डोणगाव (एम) रंडयाळ उदगीर-पडसावळी सावळेश्वर-सकर्मी- मटकी चे मठाधीश श्री.श्री. १०८ ष.ब्र. डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांचे ३० वा श्रावणमास तपोअनुष्ठान सोहळा श्रीक्षेत्र आळंदी रोड साईबाबा मंदिर व काशी विश्वनाथ मंदिर पुणे येथे सोमवार दि. २८ जुलै २०२५ रोजी प्रारंभ होणार असुन या श्रावणमास मौन तपोअनुष्ठानचा सांगता सोहळा रविवार दि. १७ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. अनुष्ठान काळात दररोज पहाटे ५ वाजता शिवपाठ, सकाळी ७ ते ९ परमरहस्य ग्रंथाचे परायण, सकाळी ९ ते १२ गुरवर्यांची इष्टलिंग महापुजा, १२ ते १ दर्शन व महाप्रसाद सायंकाळी ५ वाजता दर्शन रात्री ९ वाजता भजन आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत.*

*या श्रावणमास मौन तपोअनुष्ठान सोहळयात श्री गुरु हावगीस्वामी पुरोहित्यकार मंडळ संगीत रुद्र गायन करणार आहेत. दररोज उदगीरसह महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा सिमाभागातील भजनी मंडळ आपली सेवा बजावणार आहेत.*

*श्री गरु हावगीस्वामी गुरु युवक मंडळ, श्री. गुरु हावगीस्वामी महिला मंडळ, श्री. गुरु हावगीस्वामी देवस्थान कमिटी उदगीर, पुणे नगरीतील शिष्य व भाविक मंडळ हे श्रावणमास अनुष्ठान सोहळा आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत. डॉ. शंभुलिंग शिवाचार्य यांचे श्रावणमास मौन तपोअनुष्ठान सोहळयात सहभागी होवून दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.*


*चौकट*

*१६ ऑगस्ट रोजी दिक्षा सोहळा

पुणे येथील शिवभक्तांना दिक्षा घेण्यासाठी १६ ऑगस्ट रोजी दिक्षा कार्यक्रमाचे आयोजन केले असुन अद्याप दिक्षा न घेतलेलया अबाल, वृध्द, महिला, पुरुष यांनी दिक्षा सोहळयात सहभागी होण्याचे आवहन करण्यात आले आहे.*


#न #गुरु #गुरु

Post a Comment

0 Comments